Voters queue up enthusiastically outside polling stations during the first phase of the Bihar Assembly Election, marking a record-breaking turnout after 30 years.
esakal
Bihar Assembly Election 2025 : बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे. १८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा जागांवर जवळवपास ६५ टक्के मतदान झाले आहे. जे आतापर्यंतचे सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १,३१४ उमेदवारांनी निवडणूक लढवली, ज्यात १,१९२ पुरुष आणि १२२ महिलांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील १०२ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर १९ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. निवडणूक आयोगाने या टप्प्यात एकूण ३ कोटी ७५ लाख १३ हजार ३०२ मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संसाधने उपलब्ध करून दिली. यामध्ये १ कोटी ९८ लाख ३५ हजार ३२५ पुरुष, १ कोटी ७६ लाख ७७ हजार २१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता.
निवडणूक आयोगाच्या मते, महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमध्ये झालेल्या मोठ्या मतदानावर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. जन सूराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी गया येथे सांगितले की, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान हे बिहारमध्ये बदल येत असल्याचे लक्षण आहे. १४ नोव्हेंबर रोजी एक नवीन व्यवस्था स्थापन होणार आहे.
तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या ऐतिहासिक मतदानाबद्दल मतदारांचे अभिनंदन केले, जे १९५१ नंतरचे सर्वाधिक आहे. भारतीय निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास ठेवल्याबद्दल आणि इतक्या मोठ्या संख्येने आणि उत्साहाने मतदान केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. याचबरोबर त्यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे पूर्ण पारदर्शकता आणि समर्पणाने काम केल्याबद्दल आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.