Prime Minister Narendra Modi reacts to the record-breaking voter turnout during the first phase of the Bihar Assembly Elections, praising citizens for their democratic enthusiasm.

 

esakal

देश

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bihar Assembly Election First Phase Voting : जाणून घ्या, पंतप्रधान मोदी पहिल्या टप्प्यातील मतदानावर प्रतिक्रिया देताना, दुसऱ्या टप्प्यातील मतदानाबाबत काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

NDA in Bihar Election 2025 : २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी बिहारमधील लोकांच्या उत्साहाचे कौतुक करणारी पोस्ट केली. तसेच त्यांनी शुक्रवारी (७ नोव्हेंबर) औरंगाबाद आणि भाबुआ येथे जनतेशी संवाद साधण्याचा त्यांचा कार्यक्रमही जाहीर केला. दुसऱ्या टप्प्यातील एनडीएची तयारी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मोदींनी काय म्हटलंय? -

पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, "बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे. शिवाय, दुसऱ्या टप्प्यातही एक लाट दिसून येत आहे. लोकांच्या या उत्साहात, मला उद्या औरंगाबादमध्ये दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनीा आणि भाबुआमध्ये दुपारी साडेतीन वाजता माझ्या कुटुंबीयांशी संवाद साधण्याचं भाग्य लाभणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदानाची टक्केवारी ६४ टक्क्यांहून अधिक झाली. एनडीए नेत्यांनी याला "विकासाचा विजय" म्हटले, तर महाआघाडीने मतमोजणीची वाट पाहण्याचा आग्रह केला आहे. निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या ऐतिहासिक मतदानाबद्दल मतदारांचे अभिनंदन केले, जे १९५१ नंतरचे सर्वाधिक आहे. भारतीय निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास ठेवल्याबद्दल आणि इतक्या मोठ्या संख्येने आणि उत्साहाने मतदान केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. याचबरोबर त्यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेचेही पूर्ण पारदर्शकता आणि समर्पणाने काम केल्याबद्दल आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!

SCROLL FOR NEXT