Bihar Assembly Speaker Vijay Sinha resigned  esakal
देश

नितीश कुमार बहुमत सिद्ध करण्याआधीच सभापती विजय सिन्हांचा राजीनामा

विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Bihar Floor Test : बिहार विधानसभा (Bihar Assembly) अध्यक्ष विजय सिन्हा (Vijay Sinha) यांनी आज (बुधवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विधानसभेतील प्रचंड गदारोळ पाहता सभागृहाचं कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय.

बिहारमधील विधानसभेत नितीश सरकारनं (Nitish Government) आपलं बहुमत सिद्ध करण्यापूर्वी सीबीआयनं (CBI) नोकरीच्या घोटाळ्यामधील कथित जमिनीतील दोन आरजेडी खासदार, आमदारांसह अनेक नेत्यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. सीबीआयचे वेगवेगळे पथक आज सकाळी आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम, फयाज अहमद, आमदार सुनील सिंह आणि माजी आमदार सुबोध राय यांच्या निवासस्थानी पोहोचलं.

रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या दिल्याप्रकरणी सीबीआय आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरावर छापे टाकत असल्याचं सांगण्यात येतंय. तर, दुसरीकडं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार आज विधानसभेत बहुमत सादर करणार आहे. त्याआधी विजय सिन्हा यांनी आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यासोबतच विजय सिन्हा यांनी उपसभापती महेश्वर हजारी यांच्या जागी नरेंद्र नारायण यादव यांचं नाव घेतलं की, ते सभागृहाचं कामकाज पुढं चालवतील. यावरून वाद निर्माण झाला आहे. कारण, नियमानुसार सभापती नाही तर उपसभापती सभागृहाचं कामकाज चालवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT