bihar blast in motiharis brick kilns chimney  
देश

Blast News : वीटभट्टीवर मोठा स्फोट! ७ जण ठार, 20 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

सकाळ डिजिटल टीम

पाटना - बिहारमधील मोतिहारीमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. रामगढवा येथील नरिलगिरी येथील वीटभट्टी चिमणीत स्फोट झाला असून या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली दोन डझनहून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (bihar blast in motiharis brick kilns chimney )

दुर्घटनेतील १६ जखमींवर रक्सौलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अधिकाऱ्यांचे पथक दाखल झालं आहे. जखमींची प्रकृतीही अत्यंत गंभीर आहे.

वीटभट्टीवर स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला, असं आसपासच्या लोकांनी सांगितं. या अपघातानंतर एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं, असं बिहार पोलीस मुख्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. ठार झालेल्यांमध्ये 4 स्थानिक आणि 3 जण उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. पोलीस सहकार्य करत असून आवश्यक ती मदत करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मोतिहारी येथील वीटभट्टीवर झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. पीएमएनआरएफ प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जखमींना ५० हजार रुपये देण्यात येईल,असही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT