Chief Minister Nitish Kumar politics esakal
देश

Nitish Kumar: तुरुंगातून बाहेर येताच 'हा' बडा नेता नितीश कुमारांच्या भेटीला; बंद दाराआड चर्चा

Anant Singh: अर्ध्या तासाच्या या भेटीमध्ये अनंत सिंह मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर आले तेव्हा त्यांनी स्वतःच भेटीचं कारण सांगितलं. बाहेर येताच पत्रकारांनी अनंत सिंह यांना बोलतं केलं. त्यांनी खासगी कारणामुळे भेट घेतल्याचं सांगितलं असलं तरी दोघांमध्ये झालेल्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

संतोष कानडे

Bihar Politics: बिहारची राजधानी पाटण्याला लागून असेलल्या मोकामा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बलाढ्य नेते अनंत सिंह हे २०२५ मध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील, याबद्दल चर्चा सुरु आहेत. हा सस्पेन्स असताच अनंत सिंह हे जेलमधून बाहेर येताच अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले.

मुख्यमंत्री नितीश कुमार आणि अनंत सिंह यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातमध्ये चर्चा रंगल्या आहेत. या भेटीमागे नेमकं कारण काय, याची उत्सुकता सर्वसामान्यांनाही लागून राहिली आहे.

अर्ध्या तासाच्या या भेटीमध्ये अनंत सिंह मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर आले तेव्हा त्यांनी स्वतःच भेटीचं कारण सांगितलं. बाहेर येताच पत्रकारांनी अनंत सिंह यांना बोलतं केलं. त्यांनी खासगी कारणामुळे भेट घेतल्याचं सांगितलं असलं तरी दोघांमध्ये झालेल्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

अनंत सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठ्या कालावधीनंतर भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना भेटल्यानंतर चांगलं वाटलं. मुख्यमंत्र्यांनीही माझं यथोचित स्वागत केलं. माझ्या वैयक्तिक कामासाठी मी त्यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काम होईल, चिंता करु नका असं उत्तर दिलं.

दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर वेगवेगळे राजकीय तर्क लावले जात आहेत. अनंत सिंह यांना AK-47 प्रकरणात पाटणा हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. १६ ऑगस्ट रोजी ते बेऊर जेलमधून बाहेर आले. अनंत हे निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे. ते पुन्हा नितीश कुमारांच्या पक्षात जातील, अशीही शक्यता आहे. यापूर्वीही त्यांनी जेडीयूमध्ये काम केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

IND vs SL 1st Test : भारत-श्रीलंका पहिली कसोटी Live कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् मोबाईलवर कुठे पाहता येणार

SCROLL FOR NEXT