bihar cm Nitish Kumar statement Opponents should unite for national interest politics esakal
देश

CM Nitish Kumar : देशहितासाठी विरोधकांची एकजूट व्हावी; नितीश कुमार

नितीश कुमार; मला स्वतःसाठी काही नको

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : ‘‘माझी स्वतःची काहीही इच्छा नाही. मला स्वतःसाठी काहीही नको आहे. विरोधी पक्षांनी एकजूट व्हावे आणि देशहितासाठी पुढे जावे, हेच मला हवे आहे,’’ असे स्पष्टीकरण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले.

तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी खम्मममध्ये आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या एकत्रित सभेचे निमंत्रण नितीश कुमार यांना दिले नव्हते. याबद्दल यांना विचारले असता ‘‘ती त्यांची बैठक होती.

कोणी त्यांच्या पक्षाच्या बैठकीचे आयोजन करते आणि इतर लोकांना बोलाविले जाते, तर त्यात नवीन काय आहे, असा सवाल नितीश कुमार यांनी केला. माझी स्वतःची अशी कोणतीही इच्छा नाही. विरोधी पक्षाचे लोक एकत्र यावेत आणि देशहितासाठी त्यांनी पुढे जावे,’ एवढीच माझी इच्छा आहे.

चंद्रशेखर राव यांच्या निमंत्रणावरून देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते काल खम्मममधील संयुक्त सभेत सहभागी झाले होते. त्यांनी त्यात भाषणही केले. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि डाव्या पक्षाचे नेते डी. राजा सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा अंतिम टप्पा जवळ आल्याने काँग्रेसचे सर्व लक्ष यात्रेवर असल्याने त्यांचे नेते या बैठकीला उपस्थित नव्हते.

देशात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध करणे एका समान उद्दिष्टाने काँग्रेस वगळता विरोधी पक्ष एकत्र येणे हे महत्त्वाचे पाऊल आहे. तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस)चे राष्ट्रीय पातळीवर ‘भारत राष्ट्र समिती’ नामकरण झाल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांची ही पहिलीच मोठी सार्वजनिक सभा होती.

‘मोदी यांना घरी जावे लागेल’

पंतप्रधान मोदी यांच्‍या धोरणांवर कडाडून टीका करीत २०२४ च्या निवडणुकीनंतर त्यांना घरी जावे लागेल, असा दावा राव यांनी काल केला. तुमचे धोरण हे खासगीकरणाचे आहे तर आमचे धोरण हे राष्ट्रीयकरणाचे आहे, हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सांगू इच्छितो, असेही ते म्हणाले. २०२४मधील निवडणुकीला ४०० दिवस उरले आहेत, या पंतप्रधानांच्या विधानाचा संदर्भ देत अखिलेश यादव म्हणाले, की भाजपने त्यांचे दिवस मोजायला सुरुवात केली आहे. सध्याच्या कार्यकाळानंतर ते सत्तेत एक दिवसही टिकणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT