Girlfriend Attacks Boyfriend Esakal
देश

Bihar Crime: धक्कादायक घटनेने बिहार हादरले, तरुणीने कापले प्रियकराचे प्रायव्हेट पार्ट

Girlfriend Attacks Boyfriend: हल्लेखोर तरुणी आणि पीडित गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. आज दोघेही छपरा येथील न्यायालयात लग्न करणार होते, मात्र मुलाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने असा प्रकार केला.

आशुतोष मसगौंडे

बिहारमधील सारण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या प्रियकराने दोन वर्षांपासून नातेसंबंधात असूनही लग्नास नकार दिल्याने त्याच्यावर हल्लाकरत प्रायव्हेट पार्ट कापले. या हल्यानंतर पीडित व्यक्तीला पाटणा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकऱणी आता तरुणीवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

या सर्व प्रकरणाची माहिती सारण पोलिसांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. सारण पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, " एक जुलै रोजी मरहौरा पोलीस ठाण्यांतर्गत प्रेमप्रकरणातून एका मुलीने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापून जखमी केल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये मरहौरा पोलीस ठाण्याने कारवाई केली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी बेडप्रकाश उर्फ ​​विकास सिंग, याला उपचारासाठी सदर हॉस्पिटल, छप्रा येथे पाठवण्यात आले आहे."

दरम्यान या हल्लेखोर तरुणीला चौकशीसाठी मरहौरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेव्हा चौकशीत तरुणीने सांगितले की, दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. आज दोघेही छपरा येथील न्यायालयात लग्न करणार होते, मात्र पीडित तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने असा प्रकार केला.

याप्रकरणी मऱ्हाळरा पोलीस ठाण्यात मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. जखमी मुलाला सदर हॉस्पिटल, छपरा येथून पुढील उपचारांसाठी पाटणा येथील सृष्टी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. सध्या जखमी मुलावर पाटणा येथील सृष्टी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT