esakal

देश

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Bihar Election 2025 Update : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या १६ मंत्र्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

Mayur Ratnaparkhe

Bihar Election 2025: First Phase Voting Overview : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा उद्या  (६ नोव्हेंबर) पार पडणार आहे. सकाळी ७ वाजता मतदान प्रकियेला सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात साधारण ३७.५ दशलक्ष मतदार १ हजार ३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.

महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचेउमेदवार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तसेच विजय कुमार सिन्हा यांच्यासह १६ मंत्र्यांचे भवितव्यही पणाला लागले आहे. यामध्ये भाजपचे ११ आणि जेडीयूच्या पाच मंत्र्यांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदान होणार आहे. एकूण ४५ हजार ३४१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, त्यापैकी ३६ हजार ७३३ ग्रामीण भागात आहेत. एकूण मतदारांपैकी १०.७२ लाख नवीन मतदार आहेत, तर १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या ७.३८ लाख आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पाटणा, भोजपूर आणि बक्सर या जिल्ह्यांमध्ये मतदान होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT