Election Commission introduces new EVM guidelines with candidate’s color photo for Bihar elections.

 

esakal

देश

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Election Commission issues new guidelines : बिहार निवडणुकीपासूनच बदल दिसणार, जाणून घ्या, निवडणूक आयोगाने नेमक्या काय मार्गदर्शक सूचना केल्या आहेत?

Mayur Ratnaparkhe

Election Commission’s Big Decision Ahead of Bihar Elections: भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिका(बॅलेट पेपर) वाचण्यास अधिक वाचनीय बनविण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केली आहे. यानुसार आता बिहारच्या निवडणुकांपासून याचा प्रारंभ करून,  उमेदवारांचे रंगीत फोटो प्रथमच ईव्हीएममध्ये दिसणार आहेत. यासह, अनुक्रमांक अधिक स्पष्टपणे दर्शवला जाईल. 

 भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम बॅलेट पेपर्सची स्पष्टता आणि अधिक वाचनीय बनवण्यासाठी, विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निवडणूक संचालन नियम १९६१च्या नियम  ४९ बी अंतर्गत विद्यमान दिशानिर्देशांमध्ये सुधारणा केली आहे.

हा उपक्रम मागील सहा महिन्यात निवडणूक प्रक्रियेला सुव्यवस्थित आणि उत्कृष्ट बनवणे तसेच मतदारांची सुविधा वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आधी राबवण्यात आलेल्या २८ उपक्रमांना अनुरूप आहे.

तसेच, आतापासून  ईव्हीएम मतपत्रिकेवरील उमेदवारांची छायाचित्रे रंगीत असतील. चांगल्या दृश्यमानतेसाठी, उमेदवाराचा चेहरा फोटोच्या तीन चतुर्थांश भागावर असेल. उमेदवार, नोटाचे क्रमांक आतरराष्ट्री भारतीय अंकात छापले जातील अन् स्पष्टतेसाठी फॉन्ट आकार 30 असेल आणि ठळकपणे लिहिला जाईल

एकरूपता सुनिश्चित करण्यासाठी सर्व उमेदवार, नोटाची नावं एकाच फॉन्ट प्रकार आणि सहज वाचता येईल अशा पुरेशा मोठ्या फॉन्टच्या आकारात छापली जातील. तसेच ईव्हीएम मतपत्रिका ७० जीएसएम कागदावर छापली जातील. विधानसभा निवडणुकीसाठी, आरजीबी मानांकन असणाऱ्या गुलाबी रंगाच्या कागदाचा उपयोग केला जाईल. एकूणच आगामी निवडणुकांमध्ये प्रगत मतपत्रिकेचा वापर केला जाईल, ज्याची सुरुवात बिहार विधानसभा निवडणुकीपासून होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT