देश

‘आरजेडी’च्या फलकांवरून लालूंचे अस्तित्व पुसले; बिहार निवडणुकीत पक्षांमध्ये रंगले‘पोस्टर वॉर’ 

सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलातील (आरजेडी) ‘पोस्टर वॉर’ शहरातील चौकाचौकात रंगू लागले आहे. विशेष बाब म्हणजे ‘आरजेडी’च्या फलकांवरून पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे नाव व छायाचित्र गायब झालेले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन्ही पक्षांच्या जाहिरात फलकांवर एकमेकांवर आरोप केलेले दिसत आहे. ‘आरजेडी’च्या फलकांवरू अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे अस्तित्व पुसले आहे. आतापर्यंत पक्षाच्या फलकांवर लालू केंद्रस्थानी असत. मात्र लालू प्रसाद यांची सध्याची प्रतिमा लक्षात घेऊन निवडणुकीच्या वर्षांत त्यांच्याविना फलक लावण्याचा निर्णय घेतल्याने दिसत आहे. मात्र ‘लालू जी गरिबांच्या हृदयात आहेत. त्या स्थानावरून त्यांना हटविणे शक्य नाही,’’ अशी बाजू पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जगदानंद यांनी मांडली. लालू नसले तरी फलकावर त्यांचे पुत्र तेजस्वी यादव, पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या प्रतिमा असल्याचे त्यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘आरजेडी’ने लालूंना दूर ठेवले 
लालू प्रसाद यांचे छायाचित्र ‘आरजेडी’च्या फलकावर नसल्याने भाजपने खिल्ली उडविली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल म्हणाले की, लालू यादव यांचे छायाचित्र फलकांवर प्रसिद्ध करण्यास ‘आरजेडी’ टाळाटाळ करीत आहे. पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणी लालू तुरुंगात आहेत. अशा लालूंच्या छायाचित्रापासून त्यांचा पक्ष चार हात लांब राहू इच्छित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT