Crim News esakal
देश

Crime News : एकतर्फी प्रेमातून एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळीबार; दोन भावांचा मृत्यू, चौघे जखमी

रोहित कणसे

बिहारमधील लखीसराय मधील छठ घाटातून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सदस्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. कबिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी मोहल्ला येथे अज्ञात हल्लेखोरांनी एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन भावांचा मृत्यू झाला असून 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोळीबारात जखमी झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी भाऊ असलेल्या दोन तरुणांना मृत घोषित केले. दोन्ही भावांच्या पत्नी, वडील आणि बहीण जखमी आहेत. डीएम अमरेंद्र कुमार, एसपी पंकज कुमार, एएसपी रोशन कुमार यांच्यासह पोलीस दल घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली.

एकतर्फी प्रेमातून हल्ला

लखीसरायचे एसपी पंकज कुमार यांनी सांगितले की, एकाच कुटुंबातील सहा जण छठ घाटावरून परतत होते. त्यांच्या घराजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वी हल्लेखोराचा या कुटुंबाशी वाद झाला होता. लखीसरायच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एकतर्फी प्रेमाचे आहे.

(Latest Marathi News)

आशिष चौधरी नावाचा तरुण आपल्याच घरासमोर राहणाऱ्या मुलीवर प्रेम करत होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पण मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता. यामुळे संतापलेल्या तरुणाने मुलीच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. शशिभूषण झा, दुर्गा झा, लवली देवी, प्रीती देवी यांना गोळ्या लागल्या. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT