देश

खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची नितीशकुमारांची भूमिका

उज्वलकुमार

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची भूमिका घेत त्याबाबत देशव्यापी चर्चा होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. आज जागतिकीकरणाच्या काळात सामाजिक न्याय हे केवळ चेष्टेचा विषय न राहायला नको, त्यामुळे खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्याबाबत विचार होण्याची गरज आहे.

येथे आज पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, 14 व्या लोकसभेत आपण दलित मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. दलित बुद्धिस्ट, दलित शीख यांना याचा लाभ मिळत आहे; परंतु दलित मुस्लिम यापासून वंचित आहेत.

आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून नितीशकुमार यांनी आपला सामाजिक आधार मजबूत केल्याचे मानले जात आहे. आउटसोर्सिंगद्वारे देण्यात येणाऱ्या नियुक्‍त्यांमध्ये आरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावाला नितीशकुमार सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. ज्या संस्थांना सरकारची आर्थिक मदत मिळते तेथे कर्मचारी नियुक्तीमध्ये आरक्षण नियम लागू करावाच लागेल. राज्यात दहा हजार जण आउटसोसिंगवर काम करीत आहेत.

भाजपची साथ
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाचे खासदार हुकूमदेव नारायण यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, हा चांगला विचार आहे आणि राष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा होण्याची आवश्‍यकता आहे. खासगी क्षेत्रात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल त्यांनी नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT