nitish kumar sakal
देश

Bihar Politics : नितीशकुमार सरकारचे उद्या भवितव्य ठरणार

नितीशकुमार यांचे जवळचे मंत्री श्रवणकुमार यांच्या निवासस्थानी आज आमदारांसाठी जेवणाच्या पार्टीचे आयोजन केले होते.

उज्वलकुमार

पाटणा - राजदबरोबरची सत्ता संपुष्टात आणत अचानक भाजपशी घरोबा करून राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार बिहारमध्ये स्थापन केलेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार सरकारवर विश्वासदर्शक ठराव सोमवारी (ता.१२) मांडला जाणार आहे. या ठरावाच्या पार्श्वभूमीवर एनडीए व राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधन आमदार फुटण्याच्या शक्यतेचे सजग झाले आहे. दरम्यान राजदच्या आमदारांना तेजस्वी यादव यांच्या बंगल्यावर ठेवण्यात आले आहे.

नितीशकुमार यांचे जवळचे मंत्री श्रवणकुमार यांच्या निवासस्थानी आज आमदारांसाठी जेवणाच्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीस पक्षाचे सर्व ४५ आमदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘चिंता करू नका. सर्व काही ठीक होईल. केवळ संयुक्त जनता दलच नाही तर संपूर्ण एनडीए एकत्र आहेस,’ असे सांगत धीर दिला.

मात्र या पार्टीच्या ठरलेल्या वेळी जवळपास एक डझन आमदार न पोहोचल्याने पक्षनेत्यांत चलबिचल सुरू झाली होती. पक्षनेत्यांनी या आमदारांना दूरध्वनी करून पार्टीस आग्रहाने बोलावले. हे सर्व आमदार या पार्टीस आले तेव्हाच पक्षनेतृत्वाचा जीव भांड्यात पडला. एनडीए आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेही आपल्या आमदारांना प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावाखाली बोधगया इथे एकत्र ठेवले आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या नेत्यांनी भाजपच्या आमदारांशीही संपर्क केल्याची चर्चा होत आहे. त्याची माहिती मिळाल्यानेच पक्षाने हा वर्ग आयोजित केल्याचे समजते. वरिष्ठ नेते नंदकुशोर यादव यांनी एनडीएचे सर्व आमदार एकत्र आहेत, असा विश्वास व्यक्त केला. तसेच महागठबंधनमधील कॉँग्रेसच्या १९ आमदारांना हैदराबादला पाठविले आहे.

‘माले’ नेत्यांची मांझीशी भेट

राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनमधील भाकप (माले) चे गटनेते मेहबूब आलम यांनी आज हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे संस्थापक जीतनराम मांझी यांची भेट घेतली. मात्र मांझी आजारी असल्याने ही भेट घेतल्याचे स्पष्टीकरण आलम यांनी दिले. राजदने मांझी यांना मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला आहे. मात्र मांझी यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच राहणार असल्याचा पुनरूच्चार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT