Delhi-Vidhansabha 
देश

दिल्ली विधानसभेत ‘बिहारी बाबूं’चा प्रभाव

उज्वलकुमार

पाटणा - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजपला अक्षरशः धूळ चारली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’चे ६२ उमेदवार निवडून आले. त्यांच्या विजयात बिहारी मतदारांचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे त्यातील दहा विजयी उमेदवार हे मूळचे बिहारचे आहेत. यंदा बिहारचे दहा नेते दिल्लीचे आमदार बनले आहेत. यातील एक भाजपचे अभय वर्मा आहेत.

आपच्या दहा बिहारी उमेदवारांच्या गळ्यात यंदा दुसऱ्यांदा विजयी माळ पडली. विबुराडी मतदारसंघात ‘जेडीयू’च्या शैलेंद्र कुमार यांना ४८ हजार २२० मते मिळाली. संगम विहारमधून ‘जेडीयू’च्या शिवचरणलाल गुप्ता यांना ३२ हजार ८०३ मते मिळाली. या मतदारसंघातून ‘आप’चे दिनेश मोहनिया विजयी झाले. मोहनिया हेही बिहारचे रहिवासी आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ‘एलजेपी’ला सीमापुरी मतदारसंघ देण्यात आला होता. या पक्षाचे उमेदवार शांतिलाल हे ३२ हजार १३८ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ‘आरजेडी’च्या तीन उमेदवारांना ६०० मतेही मिळाली नाहीत. बुराडीतील त्यांचे उमेदवार प्रमोद त्यागी यांना दोन हजार २५६ मते मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीसाठी अजून थोडं थांबा! शेतकऱ्यांना दिलासा, पण प्रतीक्षा कायम; बावनकुळेंनी सांगितलं विलंबाचं खरं कारण

निर्मिती यांनी मकरंद अनासपुरेंकडून गिरवले मराठवाडी बोलीचे धडे ! सुपर डुपर सिनेमासाठी अभिनेत्रीची मेहनत

Latest Marathi News Live Update : कागदपत्रात खोडाखोड करून जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल

"लग्न कधी करणार ?" चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर ! "आई-बाबा.."

Redmi 15A स्मार्टफोन झाला लाँच! १३ हजारपेक्षा कमी किंमतीत दमदार बॅटरी; 32MP कॅमेरा अन् खूप काही, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT