court esakal
देश

बिहारच्या कोर्टाची कमाल; एकाच दिवसात दिला बलात्कार पिडितेला न्याय

सकाळ डिजिटल टीम

देशातील आजपर्यंतचा कोणत्याही POCSO न्यायालयाने दिलेला हा सर्वात जलद निकाल आहे, बिहारमधील अररिया POCSO न्यायालयाने साक्षीदार, युक्तिवाद आणि प्रतिवाद नोंदवून, आरोपीला दोषी ठरवून केवळ एका दिवसात निकाल जाहीर करून खटला पूर्ण केला आहे. हा खटला 4 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडला असला तरी ऑर्डर शीट उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी ही बाब उघडकीस आली.

या प्रकरणात विशेष न्यायाधीश (POCSO) शशीकांत राय यांच्या न्यायालयाने दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि 50,000 रुपये दंड ठोठावला आहे. यातून पीडितेला 7 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

हे प्रकरण यावर्षी 22 जुलै रोजी आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराशी संबंधित असून 23 जुलै रोजी एफआयआर दाखल करण्यात आली होती. तसेच बिहार सरकारच्या गृह विभागाने दिलेल्या प्रेस नोट नुसार टकदाचित एका दिवसाच्या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे. त्यापूर्वी, दतिया (मप्र) जिल्ह्यात, 8 ऑगस्ट 2018 रोजी न्यायालयाने तीन दिवसांच्या खटल्यानंतर निकाल दिला होता. बिहारने आता एका दिवसात खटला चालवून दोषीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देऊन राष्ट्रीय विक्रम केला आहे.'

निकाल देताना कोर्टाने सांंगीतले की, आरोपीच्या बाजूने दोष नाकारण्यात कोर्टाला कोणतेही मेरिट आढळले नाही, तसेच कोर्टाने पिडीतेच्या साक्षीवर विश्वास ठेवत सांगितले की, पिडीतेने घटना स्पष्ट केली आणि आरोपीवर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण आढळले नाही.

चाइल्ड विटनेसच्या मुद्द्यावर चर्चा करताना, सर्व टेस्ट पास झाल्याचे न्यायालयाने मान्य केले आणि साक्षिदाराच्या विधानातील सातत्य यामुळे ती साक्ष विश्वसनीय ठरली. न्यायालयाने आपल्या निकालात, 'सखारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य' या प्रकरणामधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा केली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की. जर बाल साक्षीदार सक्षम असल्याचे आढळले तर, असे पुरावे आरोपीस दोषी ठरविण्याचे कारण असू शकतात.त्यामुळे दहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी हा लैंगिक छळप्रकरणी दोषी असल्याचा निकाल दिला.

सुनावणीदरम्यान, दोषीने न्यायालयाला सांगितले की, तो त्याच्या गरीब कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहे आणि इतर कोणत्याही गुन्ह्यात त्याचा सहभाग नाही. न्यायालयाने आपल्याला शिक्षा सुनावताना नरम भूमिका घ्यावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. दुसरीकडे, सरकारी वकिलांनी न्यायालयाला बलात्कार कोणत्या पद्धतीने झाला याचा विचार करण्यास सांगितले आणि जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. सुनावणीत, वकील श्याम लाल यादव हे फिर्यादीसाठी बाजू मांडली झाले तर बचाव पक्षातर्फे अधिवक्ता विनीत प्रकाश यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT