BJP esakal
देश

Bihar Politics : लालूंच्या ‘सामाजिक सूत्रा’चा भाजपकडून वापर

बिहारच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आता ‘लालू सूत्रा’चा वापर करीत आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पाटणा - बिहारच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आता ‘लालू सूत्रा’चा वापर करीत आहे. छोट्या-छोट्या जाती-जमातींवर पक्षाच्या प्रभाव ठेवणे हे ‘लालू सूत्र’ असून विविध समाजातील संमेलनाच्या आयोजनातून याची अंमलबजावणी भाजप करीत आहे.

भाजपने आतापर्यंत नाभिक संमेलन, धानुक, कुंभार, विश्‍वकर्मा आदी जातींच्या संमेलनांचे आयोजन केले आहे. पुढील महिन्यात चंद्रवंशीसह अन्य जातींची संमेलनेही होणार आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे नव्वदच्या दशकात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते, त्यावेळी अशी जातीनिहाय संमेलने मोठ्या प्रमाणात होत होती.

तेव्हा लालू प्रसाद यांच्यावर जातींत तेढ निर्माण करण्याचा आरोप केला होता. आता मात्र समाजातील सर्व वर्गांसाठी आणि जातींना एकत्र आणण्यासाठी संमेलन घेत असल्याचा दावा भाजप करीत आहे.

अतिमागासवर्गीयांवर लक्ष

भाजपचे लक्ष अति मागासवर्गीयांवर आहे. या जाती आतापर्यंत तीन गटांत विभागल्या गेल्या होत्या. एक गट लालू प्रसाद यांच्या बरोबर होता, दुसरा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबर तर तिसरा गट डाव्या पक्षांबरोबर आहे. जातीनिहाय सर्वेक्षणाच्या अहवालानुसार बिहारमध्ये अति मागासवर्गीयांची लोकसंख्या सुमारे ३६ टक्के आहेत.

लालू प्रसाद यांना सामाजिक समर्थन कमी झाल्यानंतर त्याचा लाभ नितीश कुमार यांना मिळाला होता. या मोठ्या समाजाला खेचून घेण्याचे आटोकाट प्रयत्न आता भाजप करीत आहेत. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास नितीश कुमार यांना फटका बसणार, हे जाहीर आहे.

सवर्ण जातींची कल साहजिकच भाजपकडे आहे. समाजातील सर्व थरांना पक्षाकडे आकर्षित करून घेण्याची भाजपची रणनीती असून तसे नियोजन आखले आहे.

निवडणुकीतील सामना सोपा करण्याचा

समाजात पक्षाचे स्थान निर्माण करण्यासाठी आतापर्यंत भाजप बिहारमध्ये काँग्रेसव्यतिरिक्त पक्षांशी तडजोड करीत होता. पण आता छोट्या-छोट्या जातींवर लक्ष केंद्रित करून त्यांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्यामुळे अतिमागास वर्गांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांचे सामाजिक न्यायाचे धोरण स्वीकारून निवडणुकीतील सामना सोपा करण्याचा भाजपचा विचार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT