Stampede In Bihar And two Woman Died Stampede In Bihar And two Woman Died
देश

चेंगराचेंगरी : श्रावण सोमवारी बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात २ महिलांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सिवान : बिहारमधील सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) दोन महिलांचा मृत्यू (Dead) झाला. श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारी झालेल्या अपघातात इतर भाविक जखमी झाले आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लिलावती देवी (४२, रा. हुसैनगंज ब्लॉकच्या प्रतापपूर गाव) व सुहागमती देवी (४०, रा. जिरवी ब्लॉकच्या पाथर गाव) अशी मृत महिलांची नावे आहेत.

बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात जलाभिषेकादरम्यान ही घटना घडली. मंदिरात कोरोनानंतर पहिल्यांदाच श्रावण सोमवारी पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी बाचाबाची झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी श्रावण महिन्यात मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले आहे.

भाविकांच्या गर्दीत (Stampede) काही महिला जमिनीवर पडल्या आणि त्यांना उठण्याची संधीही मिळाली नाही, असे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू (Dead) झाला, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शिवकुमारी देवी (रा. हुसेनगंज ब्लॉकच्या सहदुल्लेपूर गाव) व अंजुरिया देवी (हुसैनगंज ब्लॉकच्या प्रतापपूर गावा) अशी जखमी महिलांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT