Two Chinese Nationals Held in Bihar esakal
देश

नेपाळ सीमेवरून चिनी नागरिकांची थेट भारतात घुसखोरी; नोएडात दोघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

चिनी नागरिक नोएडात कसे आले, त्यांना कोणी आणलं याचा शोध पोलीस घेत आहेत.

Two Chinese Nationals Held in Bihar : नेपाळ सीमेवरून (Nepal Border) बेकायदेशीररित्या भारतात घुसलेले दोन चिनी नागरिक (Chinese citizens) 15 दिवस नोएडात थांबले होते. परंतु, याची कल्पना देखील कोणत्याही पोलीस दलाला आली नाही. शनिवारी या दोघांना नेपाळ सीमेवरून परतत असताना एसएसबीच्या (SSB) पथकानं पकडलं. त्यानंतर दोघांना चौकशीसाठी बिहार पोलिसांच्या (Bihar Police) ताब्यात देण्यात आलंय.

याप्रकरणी नोएडा पोलिसांनी (Noida Police) तपास सुरू केला असून चिनी नागरिक नोएडात कसे आले, त्यांना कोणी आणलं याचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चिनी नागरिक प्रथम चीनमधून थायलंडला पोहोचले. त्यानंतर नेपाळमधील काठमांडूमध्ये दाखल झाले, तेथून सायकलवरून नेपाळच्या सीमेवर आले आणि 24 मे रोजी हे दोन्ही चिनी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात घुसले. भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाड्यानं कार घेतली आणि तेथून नोएडामध्ये राहणाऱ्या कॅरी नावाच्या मैत्रिणीकडं थांबले.

यानंतर दोघंही नोएडा आणि आसपासच्या ठिकाणी १५ दिवस फिरत होते. शनिवारी दोन्ही चिनी नागरिक भाड्याच्या कारमधून पुन्हा नेपाळ सीमेवर पोहोचले आणि कार परतल्यानंतर पायी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना एसएसबीच्या पथकानं दोघांना पकडलं. या दोघांकडून कोणताही भारतीय व्हिसा मिळालेला नाही. याशिवाय भारतात घेतलेले अनेक सिमकार्डही जप्त करण्यात आले आहेत. 30 वर्षीय लू लांग आणि 32 वर्षीय यूआन हेलांग अशी अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. एसएसबीच्या पथकानं अटक केलेल्या दोन्ही तरुणांना बिहारमधील सीतामढीच्या सुरसंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

माधुरीचं 'हे' गाणं अश्लिल म्हणत कोर्टाने केलेलं बॅन, दूरदर्शन, रेडिओवर सुद्धा गाणं वाजवण्यास होती बंदी

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

Natural Cough Relief for Children: धोकादायक कफ सिरप नकोच..! लहान मुलांना खोकला झाल्यावर 'हा' रामबाण उपाय करा

SCROLL FOR NEXT