CM Nitish Kumar
CM Nitish Kumar esakal
देश

Nitish Kumar : 'जो दारू पिणार, तो मरणारच'; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेत भाजपचा गोंधळ

सकाळ डिजिटल टीम

बिहारमधील छपरा इथं आतापर्यंत 38 जणांचा बनावट दारू प्यायल्यानं मृत्यू झालाय.

Bihar Winter Session : बिहारमधील छपरा इथं आतापर्यंत 38 जणांचा बनावट दारू प्यायल्यानं मृत्यू झालाय. मृतांचा हा आकडा सातत्यानं वाढत आहे. याच मुद्द्यावरून बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Bihar Winter Session) भाजप महागठबंधन सरकारला सातत्यानं घेरून मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांना जाब विचारत आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांनी विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, 'जो बनावट दारू पिणार, तो मरणारच! नितीशकुमारांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली असून, भाजपनं (BJP) मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

दारूबंदीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर नितीश कुमार म्हणाले, 'लोकांनी स्वत: सावध व्हायला हवं. आम्ही राज्यात दारूबंदी केली आहे. सर्व पक्षांनी मिळून हा निर्णय घेतला होता. एकामागून एक लोकांनी शपथ घेतली. तुम्ही कितीही चांगलं काम केलंत, तरी कोणी ना कोणी त्यात गोंधळ घालेल. बिहारमध्ये दारूबंदी नसतानाही बनावट दारू पिऊन लोक मरायचे. इतर राज्यातही अशा घटना समोर येत होत्या. लोकांनी स्वतःबद्दल जागरूक असलं पाहिजे. यात काही लोक चुका करतात. मात्र जो दारू पितो, तो नक्कीच मरणार आहे.'

नितीश कुमार पुढं म्हणाले, 'भाजप या मुद्द्यावरुन माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहे. दारूबंदी कायद्याचा फायदा होत नसल्याचं सांगत आहे. दारूबंदी कायद्याचा अनेकांना फायदा झाला असून भविष्यातही होत राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. दारू पिऊ नये, असंही नितीश म्हणाले. मी प्रशासनाला सांगितलंय, गरिबांना अटक करू नका. बनावट दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना अटक करा.'

विधानसभेत नितीश कुमार संतापले

तत्पूर्वी, बनावट दारू प्रकरणावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी विधानसभेत संतप्त झाले. विधानसभेत चर्चेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार नितीश कुमार यांच्या सरकारविरोधात गदारोळ करत होते. त्यावर नितीश म्हणाले की, 'तुम्ही लोक दारुवाले आणि दारू विकता. तुम्ही नशेत आहात, आता खपवून घेतलं जाणार नाही.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: लाल किल्ल्यावरून सांगतो त्यांची प्रतिष्ठा वाढलीच पाहिजे.. अदानी अंबानीवर विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे छातीठोक उत्तर

Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 'शिवप्रतिष्ठान'कडून कॅफेची तोडफोड

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर दाखल

SCROLL FOR NEXT