Bihar youth became IPS 
देश

Video: दोन लाखांत बनला 'IPS'; आईचे आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडला, नाक्यावर थांबला अन् फसला

Bihar youth became IPS officer: दोन लाख रुपये देऊन आयपीएस अधिकारी बनला होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला पकडून जेव्हा चौकशी केली, तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

कार्तिक पुजारी

पाटना- बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिकंदरा पोलिसांनी एका फेक आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो दोन लाख रुपये देऊन आयपीएस अधिकारी बनला होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला पकडून जेव्हा चौकशी केली, तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

मिथलेश कुमार हा लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस स्टेशन हद्दीतील गोवर्धन बीघा गावाचा रहिवाशी आहे. मिथलेश कुमार आयपीएसची वर्दी घालून आणि कंबरेला पिस्तुल लटकवून आपल्या दोन लाख रुपयांच्या बाईकवरून शहरात फिरत होता. एका कामामुळे तो सिकंदरा चौकात काही कामासाठी थांबला आणि तेथेच त्याचा भांडाफोड झाला.

आयपीएसच्या वर्दीतील व्यक्ती दिसल्याने लोकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. पण, मिथलेश कुमार याचे हावभाव आणि त्याची भाषा वर्दीला साजेशी नव्हती. त्यामुळे काही लोकांना संशय आला. त्यांनी लगेच सिकंदरा पोलीस स्टेशनचे अधिकारी मिंटू कुमार सिंह यांना याबाबत कळवले. पोलीस घटनास्थळी आले आणि काही प्रश्न विचारून तात्काळ मिथलेश कुमार याला ताब्यात घेण्यात आले.

मिथलेश कुमारने केले धक्कादायक खुलासे

मिथलेश कुमार याने पोलिसांना दिलेली माहिती धक्कादायक होती. त्याने पोलिसांना सांगितले की, मनोज सिंह नावाच्या एका व्यक्तीने त्याला पोलिसात नोकरी देण्याची ऑफर दिली होती. पोलिसात नोकरी लावून देण्यासाठी त्याने दोन लाख तीस हजार रुपयांची मागणी केली होती. यासाठी मिथलेशने आपल्या मामाकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले. पोलीस बनू या आशेने त्याने हे पैसे दिले होते.

मनोज सिंह याने मिथलेश कुमार याच्या शरीराचा माप घेतला. त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी बोलावून त्याला आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेश, बॅच आणि पिस्तूल दिली. पोलिसांचा गणवेश मिळाल्याने मिथलेश कुमार खुश झाला. त्याने घरी येऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेतले.

मनोज सिंहने मिथलेश कुमारला उर्वरित पैसे देण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे तो तीस हजार रुपये घेऊन मनोज सिंहला भेटण्यासाठी जात होता. पण, वाटेत तो सिंकदरा चौकात थांबला अन् सर्व काही उघडं पडलं. पोलिसांनी मिथलेश कुमारला अटक केली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे. यामागे कोणता गट कार्यरत आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT