कोस्टल रोडची लांबी वाढणार, वर्सोवा ते दहिसरदरम्यान रस्त्याची रुंदी ४४ मीटरवर; मुंबई महापालिकेचा निर्णय

Coastal Road: मुंबई महापालिका प्रशासनाने वर्सोवा ते दहिसर या प्रस्तावित कोस्टल रोडच्या संरेखनात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Coastal Road alignment Change

Coastal Road alignment Change

ESakal

Updated on: 

मुंबई : वर्सोवा ते दहिसर या प्रस्तावित कोस्टल रोडच्या संरेखनात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गोरेगाव पश्चिम, आणि अंधेरी पश्चिम विभागातील या मार्गाचे सुधारित संरेखना रस्त्याची रुंदी ३२ मीटरवरून ४४ मीटर करण्याचा प्रस्ताव सुधार समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या बदलामुळे विकास आराखडा २०३४ मधील संबंधित आरक्षणाखालील क्षेत्रफळात सुमारे ४१,१२९ चौरस मीटरने वाढ होणार आहे.

Loading content, please wait...