Rajasthan Fake Note esakal
देश

Rajasthan : राज्यात बनावट नोटांविरोधात मोठी कारवाई, पोलिसांनी दीड कोटींच्या नोटा केल्या जप्त

पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटांच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केलाय.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटांच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केलाय.

बिकानेर : राजस्थानमध्ये (Rajasthan) बनावट नोटांविरोधात (Fake Note) मोठी कारवाई करण्यात आलीय. बिकानेर पोलिसांनी (Bikaner Police) शनिवारी रात्री जयनारायण व्यास कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून बनावट नोटांच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी सुमारे दीड कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याचं सांगण्यात येतंय.

बिकानेर रेंजच्या आयजींनी स्वतः ही छापेमारी कारवाई केलीय. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. याप्रकरणी किती आरोपींना अटक करण्यात आली आणि किती रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या, याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केलेला नाहीय.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बिकानेर शहरातील पॉश कॉलनी JNVC पोलीस स्टेशन परिसरात बनावट नोटांविरोधात ही कारवाई करण्यात आलीय. बिकानेर रेंजचे आयजी ओम प्रकाश (IG Om Prakash) यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि छापण्याचं मशीन जप्त केलंय. पोलिसांना घटनास्थळी सुमारे दीड कोटी रुपयांची बनावट रोकड सापडलीय. पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेलं ब्लॉक मशीन आणि प्रिंटरही जप्त केलंय.

राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

याप्रकरणी पोलिसांनी टोळीशी संबंधित अनेक आरोपींना अटक केलीय. बनावट नोटांवर राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा आयजी ओम प्रकाश यांनी केलाय. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांनी संपूर्ण कारवाई उघड केली नव्हती. रात्री उशिरापर्यंत पोलीस बनावट नोटा मोजण्यात आणि आरोपींवर कारवाई करण्यात व्यस्त होते. बहुधा रविवारी पोलिसांच्या पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरण उघड होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT