Bilkis Bano Case esakal
देश

Bilkis Bano Case : PM मोदी-अमित शहांनी सैतानाला बाहेर सोडून दिलंय; TMC खासदाराचा गंभीर आरोप

बिल्किसवर सामूहिक बलात्कार झाला, तेव्हा बिल्किस 5 महिन्यांची गर्भवती होती.

सकाळ डिजिटल टीम

बिल्किसवर सामूहिक बलात्कार झाला, तेव्हा बिल्किस 5 महिन्यांची गर्भवती होती.

Bilkis Bano Case : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी बिल्किस बानोच्या (Bilkis Bano) दोषींच्या सुटकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी या राक्षसांना बाहेर येऊ दिलंय, असं त्यांनी म्हटलंय.

बिल्किस बानोच्या बलात्काराच्या 11 दोषींची नुकतीच सुटका करण्यात आली होती, त्यापैकी एक दोषी गोविंदभाई अखमभाई नाई यानं गावात पोहोचून सांगितलं की, हिंदू बलात्कार करत नाहीत. त्यावर महुआ मोइत्रा म्हणाल्या, 'गोविंद दोषी, खूनी आणि बिल्किसचा बलात्कारी आहे, बघा तो काय म्हणतोय? मोदी-शहा सरकारनं या सैतानाला सोडून दिलंय.'

सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयात मान्यता

बिल्किस बानोच्या दोषींची सुटका झाल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. महुआ मोईत्रा यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुजरात सरकारनं (Gujarat Government) न्यायालयाला सांगितलं की, दोषींच्या सुटकेबाबत केंद्र सरकारला माहिती देण्यात आली होती आणि केंद्रानं याला संमती दिली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महिला संघटनेनं दाखल केलेल्या या याचिकेची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानंही मान्यता दिली होती.

दोषींना कायद्यानुसार सोडण्यात आलं

बिल्किस बानोच्या दोषींची ज्या प्रकारे सुटका झाली, त्यानंतर महुआ मोईत्रा यांनी ट्विट केलंय की, आरोपीच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्या म्हणतात, आम्ही निर्दोष आहोत, तुम्ही कधी काका-पुतण्याला एकमेकांसमोर बलात्कार करताना पाहिलं आहे का? हिंदू समाजात असं घडतं का? हिंदू असं करत नाहीत, असं गोविंद नाई सांगत आहे. तो बिल्किसच्या बलात्कार आणि हत्येचा दोषी आहे. या सैतानाला मोदी-शाह सरकारनं मुक्त केलंय. बिल्किस बानोच्या दोषींची 15 ऑगस्ट रोजी सुटका झाली होती. गुजरात सरकारनं या सुटकेचा बचाव करत म्हटलं होतं की, दोषींना कायद्यानुसार सोडण्यात आलं आहे. या लोकांनी 14 वर्षे तुरुंगात काढली आहेत.

बिल्किस 5 महिन्यांची गर्भवती होती

गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो फरार असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता, तर तिची तीन वर्षांची मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्यांची हत्या करण्यात आली होती. बिल्किसवर सामूहिक बलात्कार झाला, तेव्हा बिल्किस 5 महिन्यांची गर्भवती होती. या प्रकरणात 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT