Bilkis Bano Case
Bilkis Bano Case Esakal
देश

Bilkis Bano Case: 11 दोषींच्या मुदतपूर्व सुटकेबाबत बिल्किस बानोने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे

सकाळ डिजिटल टीम

२००२ च्या गुजरात दंगलीत सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांच्या सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.एका दोषीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते की, गुजरात सरकार 1991 च्या माफी धोरणानुसार दोषींना सोडू शकते. त्या निर्णयाच्या आधारे गुजरात सरकारने सर्व 11 जणांची सुटका केली होती.

दरम्यान २००२ च्या गोध्रा दंगलीत सामूहिक बलात्कार आणि कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ दोषींच्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर संपुर्ण प्रकरणावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड विचार करणार आहेत.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

बिल्किस बानो 21 वर्षांची होती जेव्हा पुरुषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, ज्याने तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह तिच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना ठार केले, 2002 मध्ये गोध्रा ट्रेन जाळल्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत 59 यात्रेकरू मरण पावले.

बिल्किस बानो प्रकरण

2002 साली उसळलेल्या गुजरात दंगलीतल्या सर्वांत भयंकर घटनेपैकी एक म्हणजे बिल्किस बानो यांचं प्रकरण. या दंगलीमुळे बिल्किस बानो याचं आयुष्यच बदलून गेल. या दंगलीमध्ये पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या 18-19 वर्षांच्या बिल्किस बानोवर यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

बिल्किस बानोवर यांच्या तीन वर्षांच्या चिमूरडीला तिच्या डोळ्यांदेखत जमिनीवर आपटून तिची हत्या करण्यात आली. बिल्किस बानो यांची आई, दोन दिवसांचीच बाळांतीण असलेली बहिण यांच्यासह तिच्या 14 नातलगांचा संतप्त जमावाने जीव घेतला.

या घटनेने बिल्किस आणि तिचे पती याकून दोघांचही आयुष्य बदलून गेलं. गेली 17 वर्षं जीवाच्या भीतीने त्यांना वणवण भटकावं लागलं. ओळख लपवून रहावं लागलं. वीसहून जास्त घरं बदलावी लागली. एकप्रकारे भटक्या स्वरूपाच जगण त्यांच्या नशिबी आलं.

हल्ला करणारे हे सर्वजण गावातलेच होते. याच लोकांसमोर बिल्कीस लहानाची मोठी झाली होती. याच लोकांनी बिल्किस यांचे कपडे फाडले. बिल्किस यांनी गर्भवती असल्याचंही सांगितलं, गयावया केली. मात्र जमाव भडकला होता. त्यांनी बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.

बिल्किस यांची बहीण दोन दिवसांची बाळांतीण होती. तिच्यावरही बलात्कार करण्यात आला आणि तिच्या नवजात बाळाचीही हत्या करण्यात आली. बिल्किस बेशुद्ध पडल्याने त्या मेल्या आहेत, असं समजून संतप्त जमाव तिथून निघून गेला त्यामुळं बिल्कीस वाचल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boiler blast in Sonipat: डोंबिवलीतील घटना ताजी असताना आणखी एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट; ४० कामगार होरपळले, 8 जण गंभीर

Gautam Gambhir : गंभीरने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या 'त्या' मेसेजबद्दल KKR च्या नितीश राणाचा खुलासा; काय लिहिलेलं त्यात?

Latest Marathi Live News Update : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुफान गर्दी

Nashik Crime News : माजी महापौर अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; हल्ला व्यावसायिक वादातून

Porsche Accident : 'ससून'च्या चौकशी समितीला बिर्याणीची मेजवाणी; पुण्यातल्या 'या' प्रसिद्ध हॉटेलातून आलं पार्सल

SCROLL FOR NEXT