Crime esakal
देश

बिल्किस बानो बलात्कार प्रकरण: दोषी तुरुंगाबाहेर; 'या' धोरणानुसार झाली सुटका

दोषींनी 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला

सकाळ डिजिटल टीम

गोध्रा: बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषीची सोमवारी गोध्रा उप-कारागृहातून सुटका झाली. गुजरात सरकारने त्यांच्या माफी धोरणानुसार ही कार्यवाही केल्याच एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्किस बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

त्यांची शिक्षा नंतर मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. या दोषींनी 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे. त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने त्याच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला त्याची शिक्षा माफ करण्याच्या मुद्द्यावर लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सरकारने एक समिती स्थापन केली, असे पंचमहालचे जिल्हाधिकारी सुजल मायात्रा यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या समितीने या प्रकरणातील सर्व 11 दोषींना माफी देण्याच्या बाजूने एकमताने निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारकडे शिफारस पाठवली आणि सोमवारी त्यांची सुटका झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: "मी गांगुलीला तेव्हाच सांगितलेलं..." सचिन तेंडुलकरने धोनीबद्दलचा सांगितला जुना किस्सा; खास पोस्ट चर्चेत

IND vs NZ, 1st Test: बुम बुम बुमराह! तिसऱ्याच बॉलवर न्यूझीलंडच्या कर्णधाराला केलं क्लिन बोल्ड, दोन्ही ओपनर बाद; Video

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलने टॉस जिंकला! सिराज-जडेजाला मात्र बाहेर बसवलं, कोणाला मिळाली Playing XI मध्ये संधी?

SCROLL FOR NEXT