Hindu Temple Esakal
देश

Hindu Temple: कर्नाटकात हिंदू मंदिरांना द्यावा लागणार 10 टक्के टॅक्स! भाजपची काँग्रेसवर आगपाखड

tax on Hindu temples: भाजपने दावा केलाय की, काँग्रेस हिंदू मंदिरांकडून टॅक्स वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस हिंदू विरोधी निती वापरत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे भाजप आक्रमक झाली आहे. कर्नाटक राज्य सरकारने विधानसभेत हिंदू मंदिरा संबंधात ('Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024') एक विधेयक मांडले होते. त्याला मंजुरी मिळाली आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला हिंदू विरोधी ठरवलं आहे. (Bill to impose 10 percent tax on Hindu temples approved in Karnataka BJP criticize congress)

भाजपने दावा केलाय की, काँग्रेस हिंदू मंदिरांकडून टॅक्स वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस हिंदू विरोधी निती वापरत आहे. बुधवारी कर्नाटक सरकारने विधानसभेत विधेयक सादर केले. या विधेयकामुळे १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून १० टक्के टॅक्स वसूल केला जाणार आहे. शिवाय १० लाख ते १ कोटी रुपये उत्पन्न असलेल्या मंदिरांना ५ टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.

विधेयक मंजूर झाल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येदियुरुप्पा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस सरकार राज्यामध्ये हिंदू विरोधी अजेंडा राबवत आहे. आता त्यांचा हिंदू मंदिरांवर डोळा आहे. मंदिराकडून पैसे घेऊन आपली तिजोरी भरण्यासाठी नवा कायदा मंजूर करण्यात आलाय, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

सरकारकडून १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंदिरांना १० टक्के टॅक्स लावण्यात आला आहे. ही गरिबी अवस्था आहे. भाविकांनी दिलेले दान हे मंदिराचे नुतनिकरण आणि भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वापरले पाहिजे, असं विजयेंद्र म्हणाले आहेत. हिंदू मंदिरांनाच लक्ष का केलं जात आहे, असा सवाल त्यांनी काँग्रेस सरकारला विचारला आहे.

दुसरीकडे, काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप राजकारणामध्ये धर्म आणण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच खरी हिंदू समर्थक आहे, असं म्हणत राज्य सरकारमधील मत्री रामलिंगा रेड्डी यांनी पलटवार केला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. येत्या काळात याची धार वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT