Vaccination Sakal
देश

देशातील कोट्यवधी नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित

देशभर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत असताना लसीकरणाला मात्र पुरेसा वेग येताना दिसत नाही.

पीटीआय

नवी दिल्ली - देशभर कोरोनाच्या (Corona) डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Plus Variant) धोका (Danger) वाढत असताना लसीकरणाला (Vaccination) मात्र पुरेसा वेग येताना दिसत नाही. अनेक ठिकाणांवर लशींचे दोन्ही डोस (Dose) घेतलेल्यांनाही पुन्हा संसर्ग (Infection) झाल्याचा प्रकार उघड झाल्याने यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील ३.८६ कोटी लोकांनी निर्धारित वेळेमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द केंद्र सरकारनेच दिली आहे. ‘आरटीआय’अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे.

कोविन या पोर्टलवरील गुरूवार दुपारपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर ४४ कोटी २२ लाख ८५ हजार ८५४ लोकांनी पहिला डोस घेतला असून १२ कोटी ५९ लाख ७ हजार ४४३ एवढ्या जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रमण शर्मा यांनी ‘आरटीआय’अंतर्गत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींचा पहिला डोस घेणारे पण निर्धारित वेळेत दुसरा डोस न घेणाऱ्या लोकांची आकडेवारी मागविली होती. त्यांच्या या प्रश्‍नाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या लस प्रशासन विभागाने उत्तर दिले असून त्यात त्याने म्हटले आहे, की कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४-११२ दिवसांच्या फरकांनी दुसरा डोस घेणेही गरजेचे आहे. कोव्हॅक्सिनसाठी हे अंतर २८-४२ दिवस ठेवण्यात आले होते. कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर निर्धारित वेळेमध्ये दुसरा डोस न घेणाऱ्या लोकांची संख्या ही ३ कोटी ४० लाख ७२ हजार ९९३ (१७ ऑगस्ट २०२१ च्या आकडेवारीनुसार) असून कोव्हॅक्सिनबाबत हे प्रमाण ४६ लाख ७८ हजार ४०६ एवढे आहे.

लस घेतली तरी धोका कायम

‘कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता अधिक गडद झाली असून प्रतिबंधक लशींचे दोन डोस घेतले तरीसुद्धा या विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कायम राहतो.’ असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अभ्यासात आढळून आले आहे. डेल्टा लस घेतलेल्यांना संसर्गाचा असतो. याआधी संसर्गापासून बचावलेल्या लोकांना देखील बाधा होऊ शकते, असे आयसीएमआरने म्हटले आहे. महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांमध्ये डेल्टाचे रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT