Criminal Bills 
देश

Criminal Bills: आयपीसी, सीआरपीसी अन् पुरावा कायदा बदलण्यासाठी राज्यसभेत विधेयके मंजूर

फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयके मंजूर केल्यानंतर राज्यसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

Sandip Kapde

Criminal Bills: राज्यसभेत आज तीन नवीन गुन्हेगारी विधेयके मांडण्यात आली आहेत. ही तीन नवीन विधेयके बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आली. तसेच, दूरसंचार विधेयक राज्यसभेने मंजूर केले असून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयक लोकसभेने मंजूर केले आहे.

फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयके मंजूर केल्यानंतर राज्यसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर ते २२ जानेवारी दरम्यान बोलावण्यात आले होते.

भारतीय न्याय (द्वितीय) संहिता २०२३, नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता २०२३, भारतीय साक्ष्य (द्वितीय) विधेयक २०२३ राज्यसभेच मंजूर झाले आहेत.  

राज्यसभेत भारतीय न्याय (द्वितीय) संहिता 2023 वर बोलताना केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, तीन विधेयकांचा उद्देश शिक्षा करणे नाही तर न्याय देणे आहे. नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे 'तारीख पे तारीख' युगाचा अंत होईल आणि तीन वर्षांत न्याय मिळेल.

अमित शहा म्हणाले की, आम्ही सांगितले होते की आम्ही न्याय वितरणाचा वेग वाढवू, कायदे सोपे करू, भारतीय कायदे बनवू. आता आपण तेच करत आहोत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT