Bima Bharati Esakal
देश

Bima Bharati: आधी सुपारी अन् हत्येनंतर दिली मटण पार्टी; पाच वेळच्या महिला आमदाराच्या लेकाची पळापळ

Bihar Crime: भवानीपूर येथील विशाल राय याला गोपाल यदुकाच्या हत्येची सुपारी देण्यात आले होते. ही सुपारी पाच लाख रुपयांत ठरली होती.

आशुतोष मसगौंडे

बिहारमधील भवानीपूर येथे 2 जून रोजी व्यावसायिक गोपाल यदुका यांच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला आहे. माजी मंत्री, पाच वेळा आमदार आणि लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या आरजेडीच्या खासदार बिमा भारती यांचा मुलगा राजा कुमार याने व्यावसायिकाच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे आरोपींनी कबूल केले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी शूटर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. हत्येत वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांच्या चौकशीत दोघांनी ही डील पाच लाखांत झाल्याचे सांगितले. चौघांनी मिळून ही हत्या केली आहे. हत्येपूर्वी शूटरच्या खात्यावर 1 लाख 31 हजार रुपये पाठवले होते. हत्येनंतर राजाने सर्वांना मटणाची पार्टीही दिली.

इकडे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असल्याचे लक्षात येताच राजा भारती पूर्णियातून पळून गेला आहे.

असा मिळवला शूटर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी गोपाल यदुका यांच्या हत्येप्रकरणी ब्रजेश यादव, विकास यादव, संजय यादव आणि विशाल राय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आमदार बिमा भारती यांचा मुलगा राजा, संजय आणि ब्रजेश हे मित्र आहेत. तिघेही एकमेकांना ओळखतात.

भवानीपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी सुनील कुमार यांनी सांगितले की, व्यापारी गोपाल यदुका यांच्या कुटुंबीयांनी घटनेनंतर जमिनीच्या वादाचा उल्लेख केला होता. यानंतर पोलीस या अँगलवर कामाला लागले. यात त्यांना संजय नावाच्या जमीन दलालाची भूमिका संशयास्पद वाटली.

यानंतर पोलिसांनी दलालासोबत राहणाऱ्या लोकांची माहिती गोळा केली. यातून पोलिस ब्रजेश कुमारपर्यंत पोहोचले. पोलिसांनी ब्रजेशची चौकशी सुरू केली असता ब्रजेशने सांगितले की, दलाल संजय कुणाला तरी मारण्यासाठी भाड्याने शूटर शोधत होता.

परंतु, बराच शोध घेऊनही त्याला शूटर सापडला नाही. यानंतर संजयने याची माहिती बिमा भारती यांचा मुलगा राजाला दिली. त्यानंतर राजाने शूटर उपलब्ध करून दिला.

हत्येच्या दिवशी काय घडले?

भवानीपूर येथील विशाल राय याला गोपाल यदुकाच्या हत्येची सुपारी देण्यात आले होते. पाच लाख रुपयांत सुपारी ठरली होती. शूटर विशालने या हत्येसाठी विकास यादवची मदत घेतली होती. त्यानंतर 2 जून रोजी चौघांनी मिळून हत्या केली.

हत्येनंतर सर्वजण एका ठिकाणी जमले. जिथे बिमा भारती यांचा मुलगा राजा आणि इतर सहकारी आधीच थांबले होते. यावेळी राजाने सगळ्यांना मटण पार्टी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरला! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT