Biparjoy Cyclone Video  Sakal
देश

Biparjoy Cyclone Video : गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय; धडकी भरवणारे व्हिडिओ समोर

सकाळ डिजिटल टीम

Biparjoy Cyclone Video : अरबी समुद्रातील बिपरजॉय हे चक्रीवादळ वेगाने भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून गुरूवारी गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला येऊन धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर या चक्रीवादळाचे थरारक व्हिडिओ आता समोर आले आहेत.

दरम्यान, या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्या भागात रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांचे स्थलांतर केले आहे. तर या चक्रीवादळाचे धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरातेतील द्वारका येथील आहे. द्वारका येथील वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी गजरातेत मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून उद्या या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून गेल्या 9 वर्षामध्ये अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हंटलं आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे असं शाह म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT