Biparjoy Cyclone
Biparjoy Cyclone esakal
देश

Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळ बनलं धोकादायक, या राज्यांत बरसणार कहर

धनश्री भावसार-बगाडे

Biparjoy Cyclone: अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय वादळाने अतिशय धोकादायक रूप धारण केलं आहे. पुढील 12 तासांत ते आणखी भीषण स्वरूप धारण करेल. भारतीय हवामान विभागाच्या मते ते सध्या गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 860 किमी, मुंबईच्या 970 किमी नैऋत्य, पोरबंदरच्या 1,050 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीच्या 1,350 किमी दक्षिणेस आहे.

वादळामुळे गुजरातच्या किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात आणि काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातमधील मच्छिमारांना 14 जूनपर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये कहर बरसू शकतो. सध्या समुद्रकिनारी असलेल्या सर्व मच्छिमारांना परतण्यास सांगितले आहे.

बिपरजॉय अनेक राज्यांमध्ये कहर होणार

बिपरजॉय वादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा विध्वंस होऊ शकतो. या वादळामुळे भारतात मान्सून आतापर्यंत दाखल होऊ शकला नाही. बिपरजॉय वादळामुळे लक्षद्वीप, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसांत या राज्यांच्या किनारी भागात मोठा विध्वंस होऊ शकतो.

बांगलादेशने या वादळाला नाव दिले आहे. बिपरजय म्हणजे नाश. 8 ते 12 जून दरम्यान बिपरजॉय वादळाचा कहर भारतात सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे. बुधवारी, आयएडीने सांगितले होते की आग्नेय अरबी समुद्रात एक खोल-कमी दाब तयार झाला असून, ज्याचं आता तीव्र वादळात रूपांतर झाले आहे

बिपरजॉय वादळाचा प्रभाव कुठे?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बिपरजॉय 8 आणि 9 जून रोजी अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात कहर करू शकतो. वादळामुळे गुरुवारी वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किमी असेल, जो संध्याकाळी 140 किमी प्रतितास होईल. त्यामुळे कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागाला सर्वाधिक फटका बसणार आहे.

9 जून म्हणजेच शुक्रवारी दक्षिण अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा-महाराष्ट्र या भागात ते आणखी धोकादायक स्वरूप धारण करेल. त्यामुळे सायंकाळपर्यंत ताशी 160 किमी वेगाने वारे वाहू शकतात. 10 जूनपर्यंत हा वेग ताशी 170 किमी असू शकतो.

मान्सून केरळमध्ये पोहोचला

बिपरजॉय वादळामुळे मान्सून योग्य वेळी केरळमध्ये दाखल होऊ शकला नसला तरी आता मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. हवामान खात्याने गुरुवारी ही माहिती दिली. केरळमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी 1 जून ही योग्य वेळ आहे. अशा परिस्थितीत यंदा मान्सून 7 दिवसांच्या विलंबाने केरळमध्ये दाखल झाला आहे.

आता पुढील आठवड्यात उत्तर भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने यापूर्वी 4 जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु बिपरजॉय वादळामुळे तो केरळमध्ये चार दिवस उशिरा पोहोचला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Storage : पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2024

Monsoon : केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून होणार दाखल

Sakal Vastu Expo : स्वप्नातील घर आता सत्यात अवतरणार

Illegal Hoarding : पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्य होर्डिंग्ज ठरताहेत ‘काळ’

SCROLL FOR NEXT