Cyclone Biparjoy Esakal
देश

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ 48 तासांत भारतात धडकणार! गुजरात ऑरेंज अलर्ट मोडवर

बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज IMD कडून वर्तवलाय

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिपरजॉय चक्रीवादळामुळे फटका देशाला बसण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी हे चक्रीवादळ 125 ते 135 किमी प्रतितास वेगाने गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी मांडवी आणि कराची येथे धडकण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून योग्य टी खबरदारी घेण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 'बिपरजॉय चक्रीवादळ 13 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता वर ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे 290 किमी आणि जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर केंद्रीत झालं असून बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ पार करण्याची शक्यता आहे.'(Latest Marathi News)

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून 67 ट्रेन रद्द

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या ट्रेन्स रद्द केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. बिपरजॉय वादळ सध्या घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर काम करत आहे. चक्रीवादळाच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या ६७ लोकल रद्द केल्या आहेत. उद्यापूसन १५ जूनपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Latest Marathi News)

बिपरजॉय चक्रीवादळामुळे 15 आणि 16 जून रोजी कच्छ आणि गुजरातच्या काही भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एका उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आलेत.

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकलं असून अरबी समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT