Biparjoy In Pakistan  Sakal
देश

Biparjoy In Pakistan : चक्रीवादळ पोहोचले कराची किनाऱ्यावर; नागरिकांची धांदल, पाक प्रशासन झोपेत? | Video Viral

सकाळ डिजिटल टीम

Biparjoy Cyclone In Pakistan : अरबी समुद्रातील बिपरजॉय हे चक्रीवादळ वेगाने गुजरातच्या किनारपट्टीवर आले आहे. तर यासाठी प्रशासनाची सगळी यंत्रणा कामाला लागली असून जवान नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे. या चक्रीवादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे वादळ आता पाकिस्तानातील कराचीत पोहोचले आहे.

कराचीत वादळ पोहोचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून तेथील प्रशासनाची कोणतीच तयारी नसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि केंद्र सरकारने सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. तर काही भागातील नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

हे वादळ गुजरातहून पाकिस्तानच्या दिशेने वळणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. तरीही येथे कोणतीच यंत्रणा सज्ज नसल्याचं दिसत आहे. तर अनेक नागरिकांची धांदल उडाल्याचं दिसत आहे.

चक्रीवादळाचा धोक समोर दिसत असूनही पाकिस्तान सरकारने नागरिकांची कोणतीच काळजी घेतली नसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रस्त्यावरील वाहतूक, दुकाने चालू असल्याचं दिसत असून भर रस्त्यावर लोकं, गाड्या बिनधास्तपणे फिरत आहेत. पण वातावरण खवळलेलं असून सोसाट्याचा वारा सुटल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

दरम्यान, "केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून गेल्या 9 वर्षामध्ये अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हंटलं आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे" असं शाह म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT