Biparjoy Cyclone esakal
देश

Cyclone Biparjoy: चक्रीवादळाचा गुजरातला तडाखा! कच्छ, सौराष्ट्र भागांत मोठे नुकसान, वीज पुरवठाही खंडीत

कच्छ आणि सौराष्ट्रात तडाखा, एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडीत

अंकिता खाणे (Ankita Khane)

'बिपरजॉय' चक्रीवादळाचा मोठा तडाखा गुजरातला बसत आहे. गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कच्छ आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घरांचेही मोठे नुकसान झाले असुन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळामुळे 23 जण जखमी झाले आहेत. तर राज्यातील किमान एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तर मोठी झाडे कोसळली आहेत. वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुजरात प्रशासन आणि इतर यंत्रणांनी नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे.(Latest Marathi News)

या चक्रीवादळामुळे 500 कच्च्या झोपड्यांचे नुकसान झालं आहे. तर काही पक्क्या घरांचंही नुकसान झालं आहे. 800 झाडे उन्मळून पडली आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आणि बाधितांना मदत करत असल्याची माहिती संबधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.चक्रीवादळाच्या प्रभावामुळं गुजरातमधील किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. येत्या काही दिवसात राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये या राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील हवामान विभागाने केलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून विश्‍वासघात केला’: बाळासाहेब थोरातांचा आरोप, निवडणुकीनंतर महिलांना दिला धक्का

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांच्या हातात अजिबात टिकत नाही पैसा, नको तिथे अति खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : शिवराज्याभिषेक परवानगीच्या मागणीसाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT