देश

बिशप मुलक्कल यांना अटक ; केरळ पोलिसांची कारवाई

अजयकुमार

तिरुअनंतपूरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना आज एर्नाकुलममध्ये पोलिसांनी अटक केले. मुलक्कल यांची सलग तीन दिवस चौकशी सुरू होती. पुढील दोन दिवसांमध्ये मुलक्कल यांना न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती कोट्टायमचे पोलिस अधीक्षक हरिशंकर यांनी दिली. 

बिशप मुलक्कल यांनी आपल्यावर तेरा वेळा बलात्कार केल्याचा आरोप एका ननने केला होता. त्यानंतर मुलक्कल यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एर्नाकुलममध्ये पाच नन्सनी मागील 14 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात दबाव वाढल्यानंतर मुलक्कल यांची मागील तीन दिवसांपासून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. 

नन्सच्या आंदोलनाला केरळमधील इतर नन्ससह काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला होता. त्यानंतर केरळमधील सत्ताधारी पक्षातच मुलक्कल यांच्याविरोधातील कारवाईबद्दल मतभेद असल्याचे चित्र समोर आले होते. 
पोलिसांनी आज मुलक्कल यांच्या विरोधातील पुरावे गोळा केल्याचे सांगण्यात आले.

तसेच, पोलिसांनी पीडित ननचा जबाबही नोंदविला. मुलक्कल यांची आज तिसऱ्या दिवशी कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केले. मुलक्कल यांच्याविरोधात पुरावे सापडले असल्याने त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

सत्ताधारी पक्षांतील मतभेद उघड 

दरम्यान, केरळमधील सत्ताधारी माकपचे सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी बिशप मुलक्कल यांच्याविरोधात कारवाईची मागणी करीत आंदोलन करणाऱ्यांचा निषेध केला. काही जातीयवादी शक्तींची या आंदोलनाला फूस असल्याचा आरोपही बालकृष्णन यांनी केला. केरळ सरकारमधील काही मंत्री आणि माकपच्या नेत्यांनी मात्र मुलक्कल यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT