Nuh Violence 
देश

Nuh Violence : नूह हिंसाचार भडकवल्या प्रकरणी बिट्टू बजरंगीला अटक; फरीदाबाद येथून घेतलं ताब्यात

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगीला पोलिसांनी त्याच्या फरीदाबाद येथील घरातून अटक केली आहे. हिंसाचार प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अटक केली आहे. हरियाणातील नूह येथून हिंसाचार सुरू झाला होता. हिंसाचाराने गुरुग्राम आणि आसपासच्या जिल्ह्यांनाही वेढले होते. या हिंसाचाराचा मुख्य आरोपी बिट्टू बजरंगी होता.

ब्रजमंडल शोभायात्रेपूर्वी बिट्टू बजरंगीने सोशल मीडियावर अनेक प्रक्षोभक पोस्ट केल्या होत्या. बजरंग दलाच्या बिट्टू बजरंगीला सीआयए तावडू यांनी नूह हिंसाचार प्रकरणी अटक केली आहे. बिट्टू बजरंगीविरुद्ध नूह येथील सदर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एएसपी उषा कुंडू यांच्या तक्रारीवरून बिट्टू बजरंगीविरोधात गुन्हा दाखल करून नूह हिंसाचाराच्या प्रकरणात बिट्टू बजरंगीवर १४८, १४९, ३३२, ३५३, १८६, ३९५, ३९७, ५०६, २५, ५४, ५९ ही कलमे लावण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, हरियाणातील नूह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे 31 जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची परवानगीही प्रशासनाकडून घेण्यात आली होती. मात्र ब्रिजमंडल यात्रेत दगडफेक करण्यात आली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमधील हिंसाचारात रूपांतर झाले. वातावरण इतके तापले की शेकडो गाड्या पेटवण्यात आल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला.

नुहनंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT