supreme court sakal media
देश

भाजपच्या १२ आमदारांना धक्का; निलंबनाच्या स्थगितीला SC चा नकार

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील बारा आमदारांचे निलंबन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आमदारांना दणका दिला.

नवी दिल्ली - भाजपच्या (BJP) १२ आमदारांच्या (MLA) निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) नकार दिला आहे. तसंच याबाबत सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही. पुढची सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. जुलै महिन्यात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर आता राज्य सरकारला नोटिस पाठवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बारा आमदारांचे निलंबन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आमदारांना दणका दिला. विधानसभेने आमदारांचे केलेले निलंबन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी आता 11 जानेवारीला होणार आहे. यामुळे आता मात्र भाजपला कोणताही दिलासा मिळालेला नाही. तसंच विधिमंडळाकडे दिलासा देण्याची मागणी करू शकता, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

अधिवेशानात विधानसभा सभागृहात आमदारांनी गोंधळ घातला होता. याशिवाय तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं होतं. यानंतर भाजपच्या तब्बल १२ सदस्यांवर विधानसभेत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. एक वर्षासाठी ही निलंबनाची कारवाई होती. निलंबित झालेल्या आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंटी) बागडिया यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT