modi-kejriwal 
देश

Delhi : महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही ऑपरेशन लोटस; बैठकीपूर्वी आपचे आमदार नॉटरिचेबल

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 11 वाजता आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समोर आली असून, आमच्या काही आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

भाजपच्या ऑपरेशन लोटस अंतर्गत अशा स्थितीत आम आदमी पक्षाला भाजप आपले आमदार फोडेल की काय अशी शंका आहे. त्यामुळे काल संध्याकाळी आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीच्या बैठकीत सर्व आमदारांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आम आदमी पक्षाचे किती आमदार पोहोचतात याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे एकूण 62 आमदार आहेत. 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

दिल्लीत दारू धोरण घोटाळ्यावरून संघर्ष सुरू आहे. दिल्लीत पक्षाचे आमदार विकत घेण्याच्या प्रयत्नात भाजप अपयशी ठरला आणि ऑपरेशन लोटस उघड झाल्याचा आम आदमी पक्षाचा दावा आहे. काल, आपचे काही आमदार पत्रकार परिषदेतून बाहेर आले आणि त्यांनी दावा केला की त्यांना भाजपकडून 20-20 कोटींची ऑफर देण्यात आली होती आणि इतर अनेक आकर्षक आश्वासनेही दिली होती. 'आप'च्या दाव्यावर भाजपने म्हटले की, उत्पादन शुल्क धोरणाबाबतचे आरोप टाळण्यासाठी आम आदमी पक्ष अशा खोट्या गोष्टी पसरवत आहे.

भाजपने आमच्या आमदारांना धमकावलं आणि आमची २० कोटी रुपयांची ऑफर स्वीकारा नाहीतर सिसोदिया यांच्यासारख्या सीबीआय खटल्यांना सामोरे जा, असं संजय सिंह यांनी बुधवारी म्हटलं होतं. भाजपने 20-25 आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यात आता केजरीवालांनी बोलवलेल्या बैठकीपूर्वी आपच्या काही आमदारांशी संपर्क होत नसल्याचे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: शेअर बाजारानंतर सोन्याचे भावही घसरले! दसऱ्याआधी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; पाहा ताजा भाव

Omraje Nimbalkar Viral Video : राणा जगजितसिंह यांना पाहून खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसताना अचानक मागे फिरले?, व्हायरल व्हिडिओ

Mumbai Pune Expressway Bus Fire : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला अचानक आग; मोठी दुर्घटना टळली, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार लवकर मिळणार

Team India : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाला, शुभमन...

SCROLL FOR NEXT