Agnimitra Team eSakal
देश

शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात BJP कडून फॅशन डिझायनर अन्निमित्रा पॉल

पश्चिम बंगालच्या असनसोल मतदार संघातील निवडणुकीकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.

सुधीर काकडे

पश्चिम बंगालच्या असनसोल मतदार संघातील निवडणुकीकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने पक्षाच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पॉल यांची लढत पटना साहिबचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी असणार आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक पटनामधून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यावेळी भाजपच्या रविशंकर प्रसाद यांनी त्यांन पराभूत केलं होतं. अभिनेते आणि राजकारणी असलेले सिन्हा त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. सध्या ते आसनसोल मतदार संघाचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत.

अग्निमित्रा पॉल या एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून, 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत आसनसोल दक्षिण विधानसभा मतदार संघात त्यांनी तृणमूलच्या सयानी घोष यांचा पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT