bjp bhupendra patel set for 2nd term resigns gujarat chief minister politics esakal
देश

Bhupendra Patel : भूपेंद्र पटेल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या सर्व मंत्रिमंडळासह राजीनामा दिला

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला विक्रमी यश मिळाल्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या सर्व मंत्रिमंडळासह राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि पक्षाचे मुख्य प्रतोद पंकज देसाई यांच्यासह राजभवनावर जात भूपेंद्र पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत औपचारिकता पूर्ण केली.

पटेल यांच्याचकडे राज्याची धुरा राहणार असून १२ डिसेंबरला शपथविधी होणार आहे, असे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे. राज्यपालांनी पटेल यांचा राजीनामा स्वीकारला असून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पटेल हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करतील, असे देसाई यांनी सांगितले. भाजपने उद्या (ता. १०) सकाळी दहा वाजता सर्व विजयी आमदारांची बैठक बोलाविली असून या बैठकीत नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे, असेही पटेल यांनी राज्यपालांना कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT