Hindu Activist Chaitra Kundapur Arrested esakal
देश

Chaitra Kundapur : हालश्री स्वामीजींना अटक करा, बड्या नेत्यांची नावं समोर येतील; हिंदुत्ववादी नेत्या चैत्राचं स्फोटक विधान

'आरोपी हालश्री स्वामीजी (Halshri Swami) यांना अटक केल्यास या प्रकरणातील बड्या नेत्यांची नावे समोर येतील.'

सकाळ डिजिटल टीम

चैत्रा हिला अटक करून बंगळूर येथील महिला आराम केंद्रात रात्रभर ठेवण्यात आले.

बंगळूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवून देण्यासाठी पाच कोटीची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी हालश्री स्वामीजी (Halshri Swami) यांना अटक केल्यास या प्रकरणातील बड्या नेत्यांची नावे समोर येतील, असे या प्रकरणात बुधवारी अटक केलेल्या चैत्रा कुंदापूर हिने सांगितले.

त्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बैंदूर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवून देऊ, असे आमीष दाखवून किनारपट्टीवरील व्यापारी गोविंदा बाबू पुजारी यांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या हिंदुत्ववादी नेत्या चैत्रा कुंदापूर (Chaitra Kundapur) यांच्या खटल्याची सुनावणी गुरुवारपासून सुरू होणार आहे.

चैत्रा हिला अटक करून बंगळूर येथील महिला आराम केंद्रात रात्रभर ठेवण्यात आले. दहा दिवसांसाठी ताब्यात घेतलेले सीसीबी पोलिस तिला सीसीबी कार्यालयात आणून चौकशी करणार आहेत. सीसीबीच्या उपायुक्त रीना सुवर्णा या चौकशी करणार आहेत. नंतर ज्या ठिकाणी पैसे मिळाले, त्या ठिकाणी ते भेट देऊन चौकशी करतील. चैत्रा कुंदापूरसह अटक करण्यात आलेल्या मोहन कुमार उर्फ ​​गगन कडुरू, रमेश, धनराज, श्रीकांत, प्रज्वल यांची चौकशी होणार आहे.

व्यापारी गोविंदा पुजारी यांची फसवणूक केल्याप्रकरणी सीसीबीच्या ताब्यात असलेल्या चैत्रा हिला आज पोलिस जीपमधून सीसीबी पोलिसांनी आणले. गोविंदा पुजारी म्हणाले होते की, बळ्ळारी जिल्ह्यातील हडगली येथील हालश्री स्वामीजी यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क असल्याचे सांगून त्यांनी दीड कोटी रुपये घेतले होते. गोविंदा पुजारीसह चैत्रा स्वामीजींना भेटल्याची माहिती आहे.

‘स्वामीजींना पकडा, सर्व काही कळेल’

जीपमधून खाली उतरल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पहाताच तिने एक स्फोटक विधान केले. ‘या प्रकरणात आधी हालश्री स्वामीजींना पकडा. सर्व सत्य कळेल. सर, स्वामीजींना पकडल्यानंतर काही मोठी नावे समोर येतील. इंदिरा कँटीनचे बिल रेंगाळल्याने हा कट रचला गेला. प्रथम आरोपी मी असू शकते. स्वामीजी सापडल्यानंतर सर्व काही कळेल’, असे सांगून चैत्रा पोलिस कार्यालयात गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT