देश

Election Results: देशात मोदीलाट असताना भाजपच्या 'या' उमेदवाराला केवळ 125 मते

वृत्तसंस्था

लोकसभा निकाल 2019
लक्षद्वीप : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 जागा मिळाल्या आहेत तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ 81 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

या लाटेतही भारतीय जनता पक्षाच्या लक्षद्वीप लोकसभा मतदार संघातील उमेदवाराला केवळ 125 मते मिळाली आहेत. अब्दुल खादीर हाजी असे या उमेदवाराचे नाव आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद फैजल हे 22851 मते घेत विजयी झाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हमीदुल्ला सय्यद यांना (एकूण मते- 22028) पडली आहेत.

दरम्यान, लक्षद्वीप या मतदारसंघात एकूण सहा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अली अकबर यांना 143 मते पडली आहेत. तर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शरीफ खान यांना 420 मते पडली आहेत. तर जनता दलाच्या मोहम्मद सिद्धीकी यांना 1339 मते पडली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय या मतदारसंघात नोटालाही 99 मते मिळाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT