bjp want to change politic sakal
देश

आता मुस्लिम मतांवर भाजपाचा डोळा, १८५ नेत्यांना देणार प्रशिक्षण

मुस्लिमांच्या मतपरिवर्तनासाठी भाजपने

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला जे कधीही मते देत नाहीत असे मानले जाणाऱया मुस्लिम वर्गाला तुष्टीकरण नव्हे तर तृप्तीकरण या मार्गाने आपल्याकडे वळवून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हैदराबाद संदेशा‘ ची अंमलबजावणी भाजपने लगेचच सुरू केली आहे. विशेषतः ७५ वर्षांनंतरही जो मोठा वर्ग आजही गरीबीत जगत आहे अशा ‘पसमांदा‘ मुस्लिमांच्या मतपरिवर्तनासाठी भाजपने आपल्या अल्पसंख्यांक नेत्यांच्या प्रशिक्षणाचा जंगी कार्यक्रम आखला आहे. हरियाणात येत्या २५ जुलैपासून देशभरातील किमान १८५ अल्पसंख्यांक भाजप नेत्यांचा हा प्रशिक्षण वर्ग होणार आहे.

एका योजनेनुसार आगामी काळात विशेषतः भाजपशासित राज्यांतील पक्षसंघटनेत गरीब वर्गातील मुसलमानांसाठी विशेष समूहांची स्थापना केली जाईल. सरकारी समित्यांतही या समाजाचे परतीनिधीत्व वाढविण्यासाठी खास प्रयत्न भाजप करेल.

भाजपने मध्य व बहुतांश उत्तर भारतात आपला जम बसविला असून तेथे हिंदू समाजातून भाजपला यापेक्षा जास्त जनाधार मिळण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे तेलंगणाच्या मार्गे दक्षिण दिग्विजय मोहीमेवर उतरण्याचा प्लॅन भाजप नेतृत्वाने अंमलात आणण्यास सुरवात केली आहे. मात्र देशाच्या अन्य भागांतही मुसलमान समाज भाजपपासून आजही दूर आहे. २०१४ नंतर पक्ष म्हणून भाजपचे बदललेले स्वरूप, ध्येयधोरणे, पक्षाचे मुख्यमंत्री-नेत्यांची वेळोवेळी येणारी वादग्रस्त वक्तव्ये यामुळे मुसलमान समाजात सध्याच्या भाजपबद्दल भितीची व असुरक्षिततेचीच भावना दिसत आहे. माजी उपराष्ट्रपती महंमद हमीद अंसारी यांच्यापासून अनेक बुध्दिवंतांनी याचा जाहीर उच्चार वारंवार केला आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणात ‘अल्पसंख्यांकांना जिंका‘ मोहीमेची सुरवात केली व त्यासाठी देशभरात ‘स्नेहयात्रा‘ काढण्याचा आदेश पक्षनेत्यांना दिला. त्यानुसार हरियाणातील आगामी प्रशिक्षम वर्गाची संकल्पना आखण्यात आली आहे. या वर्गात पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, भाजपचे संघटनमंत्री बी एल संतोष, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह संघपरिवारातील अनेक नेत्यांचे मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षण वर्गात नुकतेच राजीनामा दिलेले भाजपचे वरिष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांचे नाव नाही व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराची घोषणा त्याच सुमारास होण्याची शक्यता आहे हा यामागील ‘योगायोग' मानला जातो.

प्रस्तावित प्रशिक्षण वर्गात अल्पसंख्यांक भाजप नेत्यांना भाजपची विचारसरणी, जनसंघापासूनचा पक्षाचा इतिहास,पक्षाचा विकासाचा दृष्टीकोन, पंतप्रधान मोदी यांचे अल्पसंख्यांकांच्या विकासासाठीचे व्हीजन, या समाजासमोरील आर्थिक आव्हाने, जनसंघ-भाजपचे आजी माजी राष्ट्रीय मुस्लिम नेते आदींबाबतची माहिती देण्यात येईल. सोशल मिडीयाचा प्रचंड मोठ्या प्रमामाऽर वापर या मोहीमेतही करण्याच्या स्पष्ट सूचना ११ अशोका रस्त्यावर २४ तास कार्यरत असणाऱया भाजपच्या ‘आय टी सेल'ला देण्यात आलेल्या आहेत.

या प्रशिक्षण वर्गात पसमांदा मुस्लिम समाजाच्या परिस्थितीबबात काही सादरीकरणेही करण्यात येतील.पसमांदा मुसलमान समाजाच्या घराघरापर्यंत जाऊन भाजप नेत्यांनी त्यांच्याशी ‘स्नेहाचा सेतू‘ बांधावा असे निर्देश देण्यात आले आहेत. ‘केवळ निवडणुका आल्या की भाजपला मुसलमानांची आठवण येत नाही तर आमचा पक्ष सदैव तुमच्या विकासासाठी कार्यरत राहतो. दीर्गकाळासाठी तुमच्याशी आम्हाला स्नेहाचे नाते जोडायचे आहे व त्यासाठी तुमची साथ मिळएल असा विश्वास आमच्या नेतृत्वाला वाटतो. पंतप्रधानांच्या गरीब कल्याणाच्या योजना पोहोचविताना भाजपने कधीही हिंदू-मुस्लिम हा भेदाभेद केलेला नाही,‘ हे या पसमांदा वर्गाला पटवून देण्याचे प्रयत्न भाजपचे सर्व नेते करतील.

स्लिम समाजातील 80 टक्के वर्ग आजहीगरीबीत रहातो. या पसमांदा मुसलमान वर्गाला निवडणुका व मते या पलीकडे जाऊन आपलेसे वाटणारे उपाय राजकीय पक्षांकडून व्हायला हवेत. भाजपने त्यासाठी जो प्रशिक्षमाचा उपक्रम राबविण्याचा निर्मय घेतला तो गंभीरपणे अंमलात आला तर पक्षाला 2024 च नव्हे तर राज्यांच्या निवडणुकांतही त्याचा मोठा फायदा मिळेल.- सईद अंसारी, राजकीय जाणकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT