Congress vs BJP sakal
देश

Congress vs BJP : खर्गे, मनमोहनसिंग हे फक्त ‘मास्क'; भाजपचा पलटवार

खुर्शीद यांचे ताजे वक्तव्य याचाच पुरावा आहे की कॉंग्रेस अध्यक्षपदी असलेले खर्गे केवळ मुखवटा

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - मल्लिकार्जुन खर्गे यांना केवळ काम करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले आहे, असे विधान काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी केले. त्यावरून भाजपने कॉंग्रेस व गांधी परिवारावर पलटवार केला.

असून ‘हा पक्ष व परिवार महत्वाच्या पदांबाबत ‘मास्क' लावून वेळोवेळी लोकांची फसवणूक करतो आहे,‘ असे म्हटले आहे. खर्गे किंवा डॉ. मनमोहनसिंग हे कॉंग्रेसचे केवळ मुखवटे असून त्यांच्या आडून गांधी घराण्याने सत्ता व अधिकाराची सारी सूत्रे स्वतःच्याच कब्जात ठेवली असेही भाजपने म्हटले आहे.

काम करणाऱ्या माणसाची पक्षाला गरज होती मात्र आपला ‘खरा नेता‘ गांधी परिवार आहे असेही खुर्शीद यांनी सांगितले. खुर्शीद यांचे ताजे वक्तव्य याचाच पुरावा आहे की कॉंग्रेस अध्यक्षपदी असलेले खर्गे केवळ मुखवटा आहेत, चेहरा नाही असे सांगून भाजप प्रवक्ते, खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की असे ‘खेळ' करून काँग्रेसचे करे नेतृत्व कार्यकर्त्यांना नेहमीच संभ्रमात ठेवते.

काँग्रेसमध्ये केवळ एका चेहऱ्याच्या जागी दुसरा चेहरा आला असून हा पक्ष मास्क लावून जनतेची फसवणूक करत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करायचे की मल्लिकार्जुन खर्गे यांना अध्यक्ष करायचे, यातून हेही स्पष्ट झाले की गांधी घराणे केवळ देशालाच नव्हे तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही फसवत आहे.

दरम्यान २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवाच्या विश्लेषणासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख ए. च्या. अँटनी यांनी काँग्रेसचा मुस्लिम ‘झुकाव' हे पराभवाचे प्रमुख कारण असल्याचे विधान केले. "तुम्हाला केवळ अल्पसंख्याकांची गरज नाही.

हिंदू बहुसंख्य आहेत." असेही ॅंटनी म्हणाले. यावर कॉंग्रेस हिंदू समाजाकडे ‘शिडी‘ म्हणून पहातो हे स्पष्ट झाले असाही त्रिवेदी यांनी हल्लाबोल केला. " २०२४ मध्ये मोदींना पराभूत करण्यासाठी तुम्हाला (कॉंग्रेस) केवळ अल्पसंख्याकांची गरज नाही. हिंदूही बहुसंख्य आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT