Punjab CM Bhagwant Mann esakal
देश

"आम्ही इशारा दिला होता"; गायक मुसेवालाच्या हत्येवरुन भाजपचं 'आप'वर टीकास्त्र

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात व्यक्तींनी रविवारी गोळ्या घालून हत्या केली. यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपनंही आम आदमी पार्टीवर सडकून टीका केली आहे. याबाबत आम्ही आधीच इशारा दिला होता, असं भाजपचे नेते मंजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटलं आहे. (We were warned BJP criticizes Arvind Kejriwal and Bhagawant Mann over singer Siddhu Musewala murder)

सिरसा म्हणाले, "सिद्धू मुसावाला हे प्रसिद्ध गायक होते. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या डर्टी पॉलिटिक्सचे ते बळी ठरले आहेत. यांच्या राजकारणामुळं मुसावाला यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. लोकांच्या सुरक्षा काढून नंतर त्यांची नाव जाहीर करणं खूपच धोकादायक ठरू शकतं असा इशारा मी दिला होता"

दरम्यान, गायक मुसावाला यांचं फॅन फॉलोविंग जबरदस्त होतं. विविध क्षेत्रातून प्रामुख्यानं मनोरंजन क्षेत्रातून मुसावाला यांच्या हत्येवर प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये कुणाल कामरा यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया देताना ही बातमी ऐकून मला धक्का बसला. ज्या कोणी हे कृत्य केलं आहे, त्याला सोडलं जाणार नाही. मुसावाला यांच्या कुटुबियांचं मी सांत्वन करतो. माझं सर्वांना आवाहन आहे की त्यांनी शांत रहावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT