दिग्विजय सिंह sakal m
देश

भाजप म्हणजे हिटलर : दिग्विजय सिंह

देश उद्ध्वस्त करीत आहेत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपची तुलना जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केली आहे. हिटलरने जर्मनीचा नाश केला तसेच भाजप भारत उद्ध्वस्त करीत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

दिग्विजय यांनी ट्विट केले. त्यांनी सांगितले की, निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. आता भाजपमधील प्रत्येक जण हिंदुत्व धोक्यात आल्याचा दावा करतो आहे आणि ते वाचविण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन करतो आहेत. हिटलर जे करत होता तेच भाजप करीत आहे. मध्य प्रदेशात तीन ठिकाणी विधानसभेची एक तर एके ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान आहे. निकाल दोन नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

आश्रमचे पडसाद

दरम्यान, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये वेब सिरीज आश्रमवरून सुरु झालेला गदारोळ अद्याप शांत होण्याची चिन्हे नाहीत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वेब सिरीजचे चित्रीकरण सुरु असलेल्या ठिकाणी धडक देऊन तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. निर्माते प्रकाश झा यांच्या तोंडाला काळी शाई फासण्यात आली होती. यावरून गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी विरोधकांना प्रत्यूत्तर दिले. ही सर्व मंडळी टुकडे-टुकडे गँगची आहेत. काहीही होऊन देशात अराजकता निर्माण व्हावी, अशांतता पसरावी अशीच त्यांची इच्छा आहे.

भाजपचे प्रत्यूत्तर

मध्य प्रदेशमधील भाजप सरकारचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिग्विजय यांना प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले की, द्विग्विजय, काँग्रेस जितक्या संकटात सापडली आहे ते पाहून तुम्ही आधी तुमचे घर सांभाळा. अन्यथा पुढील पावसाळ्यात तुमचे घर वाहून जाईल. हिंदू कोणत्याही धोक्यात नव्हते आणि अजूनही नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

बाबो! बिग बॉसनंतर छोटा पुढारी सिनेमात दिसणार, पिक्चर बाईज सिनेमामध्ये हटके अभिनय, नेटकरी म्हणाले...

T20 World Cup नंतरही भारतात अडकलेले वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेचे अखेर मायदेशी परतणार; ICC कडून तिकीटांची सोय

Darpan Award for Padma Shri Dr. Smita Kolhe: मेळघाटातील सेवाकार्यासाठी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना परभणीत दर्पण पुरस्कार

SCROLL FOR NEXT