Babul Supriyo  sakal
देश

सुप्रियो यांचेच गाणे तृणमूलविरोधी प्रचारात

बालीगंज पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू; भाजपकडून किया घोष मैदानात

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : भाजपमध्ये असताना बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करण्यासाठी गायलेले गाणे भाजप पोटनिवडणुकीच्या प्रचारात वापरणार आहे. सुप्रियो आता तृणमूल काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात आहेत.बालीगंज मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. या मतदार संघातून तृणमूल काँग्रेसने बाबूल सुप्रियो यांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांच्या विरुद्ध प्रचार करताना भाजप त्यांनीच गायलेल्या गाण्याचा आधार घेणार आहे.

`हे टीएमसी नो मोर` हे २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत लोकप्रिय होते आणि भाजपने प्रचारात त्याचा वापर केला होता. आता पुन्हा एकदा याचा वापर भाजप करणार आहे. राज्यमंत्री सुव्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे बालीगंजची जागा रिक्त झाली होती. बाबुल सुप्रियो हे असनसोलचे भाजप खासदार होते, त्यांनी आपल्या जागेचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलने असनसोलमधून चित्रपट अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आता फॅशन डिझायनर अग्निमित्रा पाल यांना शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली आहे.

बालीगंजमध्ये, तृणमूलने दिवंगत सुव्रत मुखर्जी यांच्या स्मृती सभेचे रविवारी आयोजन करून प्रचाराची सुरुवात केली आहे. या मतदार संघात बाबूल सुप्रियो यांच्याविरुद्ध भाजपने किया घोष यांना रिंगणात उतरविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SC-ST आरक्षणाबाबत मोठा निर्णय; पण सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? एका निर्णयाने रोटेशनची मागणी फेटाळली; आता चेंडू संसदेत!

Pune FDA Raids: ‘एफडीए’ची मिठाई विक्रेत्यांवर कारवाई;पुणे, पिंपरीसह जिल्ह्यात १० ठिकाणी छापे; नऊ लाखांचा साठा जप्त

Gokul Chairman Election 2026 : निवडून आलेले 25 संचालकच अध्यक्षपदासाठी पात्र; 'गोकुळ'मध्ये शासननियुक्तांना मतदानाचा अधिकार; पण पदाधिकारी होता येणार नाही

Pune Bangalore Highway traffic : ऊसदर आंदोलनाचा तिसरा दिवस; पुणे-बंगळूर महामार्ग ठप्प; साताऱ्यापासून सांगली-कोल्हापूरसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Traffic Challan: वाहनांवरील दंडावर मिळणार सवलत, थकबाकीसंदर्भात महाराष्ट्र वाहतूक पोलिस चलान अभय योजना

SCROLL FOR NEXT