narendra modi sakal media
देश

भाजप कार्यकारिणीची बैठक संपली; मोदींनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडली बैठक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी मोदींनी शेतकरी आंदोलन, आगामी विधानसभा निवडणुकांसह इतर विषयांवर कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली.

भूपेंद्र यादव म्हणाले, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत समारोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी येणाऱ्या काळात भाजपच्या धोरणांबाबत मोठा कानमंत्र सर्व कार्यकर्त्यांना दिला. मोदी म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाच्या विश्वासाचा सेतू व्हायला हवं. आम्ही मेहनत आणि जनतेच्या सेवेनं पुढे जाणार आहोत. भाजपानं आज केंद्रात जे स्थान मिळवलंय त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाजप कायम सर्वसामान्य माणसाशी जोडलेली राहिली.

नमो अॅपमध्ये उमलणार 'कमळ'

यादव म्हणाले, पंतप्रधानांनी सांगितलं की, दशकांपासून भाजपची निस्वार्थ सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचं जीवन नमो अॅपमध्ये कमळाच्या फुलाच्या फीचरद्वारे जगासमोर आणलं जावं. तसेच दुसऱ्या सत्रात गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांद्वारे येणाऱ्या काळात भाजप निवडणुकांसंबंधी संपूर्ण विषय ठेवला जाईल. या बैठकीत महागाई आणि इंधनाच्या दरांबाबतही चर्चा झाली.

पंजाबमध्ये सर्व जागांवर भाजप लढणार

पंजाबचे भाजप प्रदेशाध्यक्ष अश्विन शर्मा बैठकीत म्हणाले, "येणाऱ्या काळात भाजप सर्व जागांवर निवडणूक लढवेल. केंद्रीय मंत्री यादव म्हणाले, पंजाबच्या तयारीच्या विषयासह इतर सर्व विषय बैठकीत मांडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT