आघाडीबाबत कॅप्टन व धिंडसांशी चर्चा; शहा यांची माहिती sakal media
देश

आघाडीबाबत कॅप्टन व धिंडसांशी चर्चा; शहा यांची माहिती

शेतकरी आंदोलनाचा परिणाम नाही

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजपने आता पंजाबमध्ये आघाडीसाठी हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखदेवसिंग धिंडसा यांच्या गटासोबत चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले. शेतकरी आंदोलनाचा उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. केंद्र सरकारने आता कृषी कायदे रद्द केले असल्याने तो आता मुद्दाच शिल्लक राहिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

उत्तर प्रदेशात भाजप बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करतानाच शहा यांनी पंजाबमध्ये आम्ही कॅप्टन साहेब आणि धिंडसा यांच्या संपर्कात आहोत असे नमूद केले. या दोन्ही पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ह्रदय मोठे केले. मुळात कायदेच रद्द झाले असल्याने आता काही मुद्दे राहिले आहेत असे वाटत नाही. आता निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल, असेही ते म्हणाले.

शहा म्हणाले

  • आघाड्यांवरून निकालाचा अंदाज बांधणे अशक्य

  • मतपेढीसाठी झालेल्या आघाड्या लोकांच्या कामाच्या नाही

  • ३७० वे कलम असताना काश्मीर अशांत का होते?

  • काश्मीर खोऱ्यात गुंतवणूक, विकास प्रकल्प वाढले

  • मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर खोऱ्यामध्ये निवडणुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT