election 
देश

2019 मध्ये भाजपचा निवडणूक खर्च ४०० कोटींहून अधिक - EC

निवडणूक बाँड्समधून झाली छप्परफाड कमाई

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीनं (BJP) २०१९-२० मध्ये ३,६२३ कोटी रुपयांची छप्परफाड कमाई केली आहे. यांपैकी निवडणूक बाँडच्या माध्यमातून पक्षानं २,५५५ कोटी रुपये कमावले आहेत. निवडणूक आयोगानं (EC) ही माहिती जाहीर केली.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सन २०१९-२०च्या लेखापरीक्षणातील पावत्यांनुसार, भाजपला ३,६२३ कोटी २८ लाख ६ हजार ९३ रुपयांच्या एकूण देणग्या मिळाल्या आहेत. तर याच काळात भाजपने १६५१ कोटी २ लाख २५ हजार ४२५ रुपये इतका खर्च केला आहे.

भाजपचा निवडणूक खर्च ४०० कोटींहून अधिक

पीटीआयच्या वृत्तानुसार, सन २०१९-२० मध्ये भाजपला निवडणूक बाँडच्या माध्यमातून एकूण २,५५५ कोटी १ हजार रुपये मिळाले आहेत. या काळात निवडणूक आणि प्रचारावर भाजपाचा १३५२.९२ कोटी रुपये एकूण खर्च झाला. यामध्ये उल्लेखनीय बाब ही की, सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक खर्च आणि सर्वसाधारण प्रचाराच्या रुपात भाजपने जाहिरातींवर ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला.

भाजपशिवाय सन २०१९-२०मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) निवडणूक बाँडच्या माध्यमातून २९.२५ कोटी रुपये, तृणमूल काँग्रेस पक्षाला (TMC) १००.४६ कोटी रुपये, द्रमुकला ४५ कोटी रुपये, शिवसेनेला ४१ कोटी तर राष्ट्रीय जनता दलाला (RJD) २.५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे २२ जुलै २०२१ रोजी हा डेटा जमा करण्यात आला होता. त्यानंतर या आठवड्यात निवडणूक आयोगानं ही माहिती सार्वजिनक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT